Akola News : रेबीजचा धोका टाळण्यासाठी श्वानांचे लसीकरण करा - डॉ. बुकतारे

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बुकतारे यांचे आवाहन
vaccinate dogs to avoid risk of rabies
vaccinate dogs to avoid risk of rabiesSakal
Updated on

अकोला : रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी ३६ टक्के मृत्यू केवळ भारतात होतात. भारतात ९५ टक्के प्रकरणात माणसांना रेबीज होण्यामागे कुत्रा कारणीभूत आहे. त्यामुळे कुत्रा पाळणाऱ्या कुटुंबांनी श्वानांमधील अँटी रेबीज लसीकरण पूर्ण करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी येथे केले.

जागतिक रेबीज दिवसानिमित्त माहिती देताना ते म्हणाले की, रेबीज पशुसंक्रमित मानवी आजार असून जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे.

जगभरात दरवर्षी ५९ हजारपेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे प्राण गमवावे लागतात. आशिया आणि अफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतात ९५ टक्के प्रकरणात कुत्र्यामुळे, २ टक्के प्रकरणात मांजर आणि १ टक्के प्रकरणात कोल्हा किंवा मूंगुसामुळे रेबीज पसरतो.

त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी श्वानांमधील ॲन्टी रेबीज लसीकरण प्रभावीरित्या मोहीम स्वरुपात राबविणे आवश्यक आहे. दरम्यान पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आपल्या कुत्र्यांचे श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ. जगदीश बुकतारे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.

रेबीज विषाणूजन्य रोग

रेबीज हा रोग उष्णरक्त वर्गीय प्राण्यांमध्ये दिसून येणारा घातक विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचे विषाणू पशुधनाच्या मज्जासंस्थेस बाधित करतात. मज्जासंस्थेचे दाट जाळे असणाऱ्या भागातील स्त्रावातून हे विषाणू शरीरातून बाहेर पडतात. पशुधनाच्या चावण्याने (दंश) या विषाणूचा प्रामुख्याने प्रसार होतो.

श्वानदंश अथवा रेबीज रोगाविषयी संक्षिप्त माहिती

  • संशयास्पद श्वानदंश आजारी पशुधनाबाबत श्वान दंश झाल्याचा किंवा पिसाळलेला भटका कुत्रा परिसरात आल्याचा पूर्व इतिहास असणे आवश्यक आहे.

  • बाधित पशुधनास रेबीज झाल्याचा संशय बळावत असेल तर अशा पशुधनास हाताळू नये.

  • अशा बाधित पशुधनास उपचार करणे निरुपयोगी ठरते.

  • संशयास्पद, बाधित पशुधनाचे विलगीकरण करावे.

  • अशा पशुधनांचा उरलेला चारा पिण्याचे पाणी भांडी शेड व परिसराचे निर्जंतुकीकरण करवे.

  • बाधित पशुधन मृत झाल्यास शवविच्छेदन करीत असताना व्यक्तिगत जैवसुरक्षा साधणे जसे पीपीई कीट ग्लोज मास्क फेसशिल्ड वापरावा शवविच्छेदनानंतर सर्व प्रावणे जाळून टाकावित.

प्रतिबंधासाठी दोन प्रकारे लसीकरण

  • श्वानदंशापूर्वी ः प्राथमिक लसीकरण सर्व साधारणतः प्रति बंधात्मक लसीची ३ इंजेक्शने शून्य दिवस ७वा दिवस आणि २१/२८ वा दिवस. बुस्टर लसीकरण प्राथमिक लशीकरणानंतर १ वर्षाने. लस उत्पादकांच्या सूचनांनुसार लसीकरण वेळापत्रक व लस मंत्राची संख्या याचे तंतोतंत पालन करावे.

  • श्वानदंशानंतर ः श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण केलेले व प्रतिबंधात्मक संरक्षण कालावधीत श्वानदंश झालेला असल्यास पशुधनास फक्त लसीची दोनच इंजेक्शने घ्यावी लागतात. त्या लसीकरणाचे वेळापत्रक ज्या दिवशी पहिली लस घेतली तो शून्य दिवस असून त्या नंतर तीन दिवसाने दुसरी लस घेण्यात यावी.

श्वानदंशानंतर करावयाच्या उपाययोजना

  • मज्जा संस्थेसंबंधी लक्षणे दिसून आल्यास अशा पशुधनातील उपचार काळजीपूर्वक व संरक्षक प्रावणे (पीपीई कीट, ग्लोब्ज, मास्क, फेसशिल्ड) करावेत.

  • बाधित पशुधन चावल्यास, लाळेशी संपर्क आल्यास साबणाच्या द्रावणाने किंवा डिटर्जंटच्या द्रावणाने जखम धुवून काढावी. जखमेवर २ टक्के ॲक्वियस क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड लावावे. त्यानंतर टीक्चर आयोडीन, पोव्हीडोन आयोडीन लावावे. जखमेस पट्टी बांधू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.