अकोला - राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुती व महाविकास आघाडीसोबत समान अंतर ठेवून राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघात आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याचा निर्णय घेण्यात येत असून, कार्यकर्त्यांनी निवडणूकीसाठी जोमाने तयारी सुरू करण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्षाचा 21 वा वर्धापन दिन सोहळा मराठा मंगल कार्यालयात गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.