अकोला : जिल्ह्यातील(District) ४८ ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या ६१ जागांसाठी पोटनिवडणुकीचा जाहीर प्रचार रविवारी (ता. १९) थंडावल्यानंतर मंगळवारी (ता. २१) संबंधित ग्रामपंचायतींच्या ६१ मतदान (Vote) केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यासाठी ६१ मतदान केंद्रांवर मतदान पथकं सोमवारी दुपारीच दाखल झाले. दरम्यान पोटनिवडणुकीत १२६ उमेदवार रिंगणात आहेत.राज्य निवडणूक आयोगाचे पत्र १७ नोव्हेंबर २०२१ अन्वये निधन, राजिनामा, अर्नहता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या पदांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींमध्ये ४०३ पद रिक्त असल्याने त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम लागू करण्यात आला.
पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९ डिसेंबरपर्यंत ५२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. काही ग्रामपंचायतींमध्ये यावेळी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने अनेक जागा रिक्त राहिल्या तर काही ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान असले असले तरी ६१ पदासांठी ४८ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी (ता. २१) सकाळी ७ वाजतापासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
२४ हजार मतदारांच्या हाती चाबी
ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत २४ हजार ६८० मतदार मतदान करणार आहेत. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यात २ हजार २२८, अकोटमध्ये २ हजार ७४५, मूर्तिजापूरमध्ये ४ हजार ७९४, अकोला तालुक्यात ८ हजार ६५२, बाळापूर १ हजार ८१०, बार्शीटाकळीत २ हजार ३०५ मतदार, तर पातूरमध्ये २ हजार १४३ मतदार मतदान करणार आहेत.
मतदान पथके दाखल
पोटनिवडणुकीसाठी सात तालुक्यातील तहसिल कार्यालयातून मतदान पथके सोमवारी (ता. २०) मतदान केंद्रांवर दाखल झाले. आवश्यक साहित्यासह पथक मतदान केंद्रांवर दाखल झाल्यानंतर त्यांनी मतदानाची पूर्व तयारी केली. एका पथकामध्ये मतदान अधिकाऱ्यासह तीन सहाय्यकाचा समावेश करण्यात आला.
ग्रा.पं. संख्या व रिंगणातील उमेदवार तालुका ग्रा.पं. उमेदवार
तेल्हारा ०५ १०
अकोट ०५ १४
मूर्तिजापूर ११ ३१
अकोला १२ ३५
बाळापूर ०४ १०
बार्शीटाकळी ०४ १२
पातूर ०७ १४
एकूण ४८ १२६
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.