Akola News : अवैध दारु विक्रीविरोधात वाईन बार व बिअर बार असोसिएशनचा एल्गार

एकदिवसीय बंद, दुकानाच्या चाब्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
Akola News
Akola Newsesakal
Updated on

अकोला : जिल्हयात अवैध दारु विक्री सुरु असून यामुळे अधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार अकोला जिल्हा वाईन बार व बिअर बार असोसिएशनने केली आहे. तर यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक सीमा झावरे यांच्याकडे गेलेल्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला होता. बुधवारी, २६ जूनरोजी दुपारी हा प्रकार घडला.

Akola News
Jalgaon News: सांडपाणी प्रकल्पातील कोट्यवधींची मशिनरी पडून! वॉरंटी संपली; महापालिकेचे डिझेलवरील 80 लाख रुपये पाण्यात

शहर व जिल्ह्यात खूल्या जागेत बेछूटपणे दारु विक्री होत आहे. याबाबत राज्य उत्पादक शुल्क विभागाला अनेकदा लेखी तक्रारी देवून माहिती दिली. तरीही या प्रकाराचा बंदोबस्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग अपयशी झाला आहे. यामुळे परवानाधारक विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. याप्रकाराबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांना निवेदन देण्यासाठी पदाधिकारी गेले होते. मात्र पदाधिकाऱ्यांचे कुठलेही न ऐकता उलट त्यांनाच हीन वागणूक देण्यात आली. यामुळे विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला. शिवाय आज दिवसभर दुकाने बंद ठेवल्याने लाखो रुपयांचे आर्थीक नुकसानाचा फटकाही बसला.

विक्रेत्यांचा अधीक्षक कार्यालयावर ठिय्या

अधीक्षकांना भेटण्यासाठी गेलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अरेरावीची भाषा वापरल्याने विक्रेत्यांनी कार्यालयासमोरच ठिय्या दिला. यामध्ये जिल्हा वाईन बार व बिअर बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पवनीकर, सचीव राजेश गोसावी, श्रीकांत देशमुख, संतोष अग्रवाल, काशीसेठ बहल, मुरलीसेठ लुल्ला, राजेंद्र सहगल आदी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.