पोलिसांच्या मदतीने फुलले गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य

पोलिसांच्या मदतीने फुलले गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य
Updated on

गजानन काळुसे

सिंदखेड राजा : बुलढाणा जिल्ह्यातील हरवलेल्या बालकांचा शोध घेवून त्यांना त्यांच्या आई-वडील व कुटुंबाकडे सोपविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया ,अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोड यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली 'ऑपरेशन मुस्कान' राबविले जात आहे. १ ते ३० जुन पर्यत जिल्ह्यात 'ऑपरेशन मुस्कान' राबविले जात असुन त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी काम करत आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत हरविलेल्या मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.आतापर्यंत २९ हरविलेल्या मुलांचा शोध घेवुन त्यांना त्यांच्या आई-वडील व कुटूंबाकडे स्वाधीन केले आहे. तर २५६ भीक मागणारे , बेवारस फिरणाऱ्या मुलांना सुद्धा कुटूंबाकडे स्वाधीन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस दलातर्फे 'त्यांच्या’ चेहर्‍यावर हास्य फुलवण्याचे काम पोलिस दलाकडून पाहायला मिळते. (With the help of the police, a smile appeared on the face of the needy)

पोलिसांच्या मदतीने फुलले गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य
वाशीम बायपासवरून पळविला डिझेलचा टँकर

हरवलेल्या मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून देण्याचे काम पोलिसांसाठी आव्हानात्मक असते. मुला- मुलींना पळवून, त्यांना भीक मागण्याच्या व्यवसायात ढकलले जाते. त्यामुळे शेकडो मुले बेवारस होतात.

‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत ० ते १८ वयोगटातील हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांकडे सुपूर्द करण्याचे काम १ जुन पासून सुरू करण्यात आले आहे. सदरची मोहीम ३० जुन पर्यत असणार आहे. बाल वयात मुलांना व्यवहारिक ज्ञान राहत नाही. त्यामुळे काहीजण मुलांना भीक मागण्यांसाठी त्यांना प्रवृत्त करतात.त्यामुळे लहान मुले कुटूंबापासुन वेगळे होतात, शिक्षणा पासुन वंचित राहतात.

पोलिसांच्या मदतीने फुलले गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य
लहान मुले फणफणली, कोरोनाची भीती, रिसोड येथे डेंगूचे थैमान

काही वेळेस मुले वाम मार्गाला केले असल्याचे पहायला मिळते, अल्पवयीन मुला-मुलींचा आणि त्यांच्या पालकांचा शोध घेऊन या ‘वाट चुकलेल्या’ मुला-मुलींना त्यांच्या आई- वडिलांकडे सुपूर्द करण्याचं काम जिल्हा पोलिस दलाकडून सुरू आहे.जिल्ह्यामधील रस्त्यावर भीक मागणारे , निराधार , बेवारस फिरणारे २५६ मुलांना त्यांच्या स्वाधीन करून पालकांना समज देवून लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करणे , निगा राखणे, यासह अनेक बाबींची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पालकांना देत आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे महिला पोलीस हवालदार गीता बामंदे, आताऊल्ला खान,नदीम शेख ,गजानन चतुर, प्रभू परिहार, राजेश ठाकूर कल्पना हिवाळे, हे सहभागी आहेत.

पोलिसांच्या मदतीने फुलले गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य
व्हॉट्सॲपवर बदनामीकारक स्टेटस ठेवल्याने तरुणीची आत्महत्या

जिल्ह्यात हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान पोलीस यंत्रणेमार्फत राबविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.ऑपरेशन मुस्कान मोहिमे अंतर्गत जास्तीत जास्त मुलांचा शोध घेवून त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यत पोहचण्यासाठी पोलीस दल काम करत आहे. सद्या जिल्ह्यात २९ हरविलेल्या मुलांचा शोध घेण्यात आला आहे. तर २५६ बेवारस फिरणाऱ्या मुलांना कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये पालकांना सुचना दिल्या जात आहे. ऑपरेशन मुस्कान च्या पथकांनी मेहनत घेतली.त्यामुळेच शक्य झाले आहे.

अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधिक्षक बुलडाणा

With the help of the police, a smile appeared on the face of the needy

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.