बाळापूर - घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करताना एका २५ वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास बाळापूर येथील भिकूंड नदीवर घडली. स्थानिक नागरिक व संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.