जिल्हा परिषद निवडणूक; राष्ट्रवादीसह वंचितची आकडेमोड कायम राहणार का?

जिल्हा परिषद निवडणूक; राष्ट्रवादीसह वंचितची आकडेमोड कायम राहणार का?
Updated on

वाशीम ः जिल्हा परिषदेतील इतर मागास प्रवर्गातील रिक्त झालेल्या १४ जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी पक्षांना आपले संख्याबळ राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. हे संख्याबळ गडबडले, तर जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन बिघडण्याची शक्यता आहे. (Zilla Parishad elections; Will the figure of the deprived with the NCP remain the same?)
वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी नियोजीत आरक्षणापेक्षा अधिक आरक्षण घोषित करण्यात आले होते, मात्र घोषित आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे आरक्षण अधिक होते. त्यामुळे या आरक्षणावर उच्च न्यायालयात विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. यावर सुनावनी होवून उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. तत्कालीन राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या जुन्याच कार्यकारीणीला मुदतवाढ दिली होती.

जिल्हा परिषद निवडणूक; राष्ट्रवादीसह वंचितची आकडेमोड कायम राहणार का?
धक्कादायक, सिझर करताना पोटात राहिली बँडेजची पट्टी

यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारून प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आरक्षणा संदर्भातील सर्व याचिका दाखल करून घेत, न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश आयोगाला दिले होते. आयोगाने यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या होत्या. दरम्यान, या याचिकेवरील सुनावनी सुरुच होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने जिल्हा परिषदेच्या मागास प्रवर्गातील जागावरील निवडणुका रद्द ठरविल्या होत्या. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुढील दोन आठवडयात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश दिले होते. आता निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा परिषदेमधील एकूण ५२ जागा पैकी १४ जागांवर निवडणूक होत आहे. काटा , पार्डी, टकमोर, उकळी पेन, पांगरी नवघरे, कवठा खुर्द, गोभणी, भर जहागीर, दाभा, कंझरा, भामदेवी, कुपटा, फुलउमरी, आसेगाव, तळप या गटांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद निवडणूक; राष्ट्रवादीसह वंचितची आकडेमोड कायम राहणार का?
वाढीव पाणीपुरवठा योजनेत गैरप्रकार, शिवसेनेची मंत्र्यांकडे तक्रार

बाद झालेले संख्याबळ
- राष्ट्रवादी ३
- वंचित ४
- जनविकास आघाडी २
- काँग्रेस १
- शिवसेना १
- भाजप २
- अपक्ष १

जिल्हा परिषद निवडणूक; राष्ट्रवादीसह वंचितची आकडेमोड कायम राहणार का?
वऱ्हाडात १६७६ ग्राहकांची ‘बत्ती गुल’


चर्चा महाविकास आघाडीची
सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना यांची सत्ता होती, मात्र इतर मागास प्रवर्गातील आरक्षण रद्द करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, शिवसेनेचे बांधकाम सभापती विजय खानझोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती शोभाताई गावंडे यांची पदे रिक्त झाले होते. आता या निवडणुकीत या पक्षांना आपले संख्याबळ कायम ठेवावे लागणार आहे. अन्यथा जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन बिघडणार आहे. जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद सदस्य संख्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२, काँग्रेस , भारिप-बमसं ८, भाजप ७, वाशीम जिल्हा जनविकास आघाडी ७, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ व अपक्ष २ असे पक्षीय बलाबल होते. यामध्ये थोडा जरी बदल झाला तर राजकारण बदलणार आहे.

संपादन - विवेक मेतकर

Zilla Parishad elections; Will the figure of the deprived with the NCP remain the same?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.