जि.प. पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग

जि.प. पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग
Updated on


अकोला ः जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पाेट निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीसह भाजपने सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून, शिवसेनेनेही इच्छुकांकडून अर्ज मागितले आहे. मात्र, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससह शिवसेनाही वरिष्ठांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. काँग्रेसने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला असला तरी जि.प. निवडणुकीच्या निमित्ताने मात्र अद्याप कोणताही निर्णय जाहीर केला नाही. (Z.P. Political developments begin for by-elections)

जि.प. पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग
धक्कादायक, सिझर करताना पोटात राहिली बँडेजची पट्टी


अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक सन २०२० मध्ये झाली होती. जि.प.निवडणुकीत काेणत्याच राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. सर्वाधिक २५ सदस्य असलेल्या वंचित बहुजन आघाडीला केवळ दाेन सदस्यांची आवश्यकता हाेती. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकूण २१ सदस्यांची माेट बांधली हाेती. त्यानंतर वर्षभरातच आरक्षणाची टक्केवारी ५० पेक्षा जास्त गेल्याचा मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ओबीसी सदस्यांचे पद रद्द झाले. त्यामुळे जि.प.च्या १४ जागांसाठी पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी १९ जुलै मतदान होणार असून, २० जुलैला मतमोजणी होणार आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे.

जि.प. पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग
वऱ्हाडात १६७६ ग्राहकांची ‘बत्ती गुल’



जुन्यांनी संधी की, नवा गडी नवा राज!
ओबीसी सदस्यांचे पद रद्द झाल्याने या जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या सदस्यांना संधी मिळते की, पोटनिवडणुकीच्या निमित्ताने नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाते याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून दानापूर (स्त्री) सर्कलच्या दीपमाला दामधर, अडगाव- प्रमोदिनी कोल्हे (वंचित), तळेगावच्या-संगीता अढावू, कुरणखेड- मनीषा बोर्डे, कानशिवणी- चंद्रशेखर पांडे गुरूजी, अंदुरा- संजय बावणे, देगाव- रामकुमार गव्हाणकर, शिर्ल- सुनील फाटकर यांचे पद रद्द झाले होते. महाविकास आघाडीतील अकोलखेड येथून निवडून आलेले कॉंग्रेसचे गजानन डाफे, शिवसेनेचे लाखपूर येथील अप्पू तिडके व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दगडपारवा (स्त्री) येथून निवडून आलेल्या सुमन यांचेही पद रिक्त झाले. भाजपच्या कुटासा (स्री) सर्कलच्या कोमल पेटे, बपोरी- माया कावरे, घुसर पवन बुटे यांचे पद रिक्त झाले.

संपादन - विवेक मेतकर

Z.P. Political developments begin for by-elections

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.