झपाटे यांचा जनावरांचा गोठा 
अ‍ॅग्रो

अल्पभूधारकाची दुग्धव्यवसायात प्रगती

राजकुमार चौगुले

जनावरे मग ती दुभती असोत की नको असलेली, योग्य संगोपन करून त्यांची वंशवृद्धी केली, अर्थप्राप्तीसाठी थोडा संयम ठेवला तर नफा देणारा दुग्धव्यवसायासारखा दुसरा कोणता व्यवसाय नसेल. हे अनुभवाचे बोल व्यक्त केले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील रुई येथील अल्पभूधारक सदाशिव झपाटे यांनी. सुमारे ४१ जनावरांचा हा व्यवसाय अत्यंत कष्टातून व विविध वैशिष्ट्य़ांनी त्यांनी नावारूपाला आणला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोल्हापूर जिल्ह्यात रुई (ता. हातकणंगले) येथील सदाशिव दत्तात्रय झपाटे यांची फक्त सव्वा एकर शेती आहे. पदवी शिक्षणानंतर किराणा दुकान व पीठगिरणी त्यांनी सुरू कली. पण स्पर्धा वाढू लागल्याने त्यातील नफा कमी झाला. मग पर्याय शोधण्यास प्रारंभ केला. शेतात ऊस होता. पण क्षेत्र कमी, त्यामुळे उत्पन्नावर मर्यादा आलेल्या. अखेर विचारांती दुग्धव्यवसाय करून पाहायचे ठरवले. सन २०१६ मध्ये जिल्हा उद्योग केंद्राचा डेअरी व पोल्ट्रीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 

दहा म्हशींपासून सुरुवात
हरयाणा व हिस्सार राज्यातून दहा म्हशी आणून व्‍यवसायाचा श्रीगणेशा केला. कोणताच अनुभव नसल्याने घरच्या सदस्यांच्या परिश्रमातून व्यवस्थापन सुरू केले. सुरुवातीला थोडे स्वतःजवळचे व थोडे कर्ज करून तीस लाख रुपये भांडवल गुंतविले. आई बाळाबाई तसेच जयंत व विवेक ही दोन्ही मुले शिक्षण सांभाळत सदाशिव यांना मदत करू लागली. 

आजचा व्यवसाय दृष्टिक्षेपात

  • एकूण जनावरे (लहान-मोठी मिळून) -४१ 
  • पैकी मुऱ्हा म्हशी- १९ 
  • देशी गाय- १  
  • सुमारे साडेतीन हजार चौरस फुटाचा गोठा, हवेशीर बांधणी
  • सभोवताली कापड लावून वातावरण मोकळे राखण्याचे प्रयत्न
  • उन्हाळ्यासाठी फॅन. औषधांसाठी स्वतंत्र रॅक
  • मजुरांसाठी स्वतंत्र खोली, 
  • चारा साठवणूक व कापणीसाठी स्वतंत्र व्यवस्था

अर्थकारण
दूध 

  • दररोज म्हशीच्या दुधाचा गवळ्याला ४० लीटर तर स्थानिक डेअरीला ७० लीटर पुरवठा
  • गायीचे सर्व दूध संस्थेला
  • गवळ्यासाठीच्या दुधाचा दर ५२ रुपये तर दूध संस्थेसाठीच्या दुधाचा दर ४० रुपये प्रति लीटर
  • गवळ्याकडून महिन्याला मिळणारी रक्कम 62000 रुपये
  • पशुखाद्य, मजूर, विकतचा चारा, औषधोपचार व अन्य मासिक खर्च- किमान एक लाख २० हजार रु. 
  • एकूण उत्पन्नातून मिळणारा नफा- ४० ते ५० टक्के . 
  • दूध संघाकडून मिळणारे वार्षिक रिबेट सुमारे सव्वा लाख रु.  

शेणखत

  • महिन्याला सुमारे ८ ट्रॉली शेणखत 
  • प्रति ट्रॉली १५०० रुपये दर गृहीत धरल्यास महिन्याला १२ हजार रुपये अर्थप्राप्ती

जनावरांचे व्यवस्थापन

  • पहाटे चार- पाच ते सकाळी सात व दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत काम
  • प्रति जनावराला दोन्ही वेळचे मिळून ३० किलो खाद्य
  • यात गवत, कडबा, उसाच्या लहान कांड्यांचा समावेश
  • दहा लीटर दूध देणाऱ्या म्हशीला दोन्ही वेळचे मिळून दहा किलो, भाकड जनावरांना दिवसाला दोन किलो तर वासरांना दररोज एक किलो खाद्य
  • वर्षातून दोन वेळा विविध रोगांसाठी लसीकरण 
  • तीन महिन्यातून जंत निर्मूलन उपाय
  • कृत्रिम रेतनाचा वापर, रेतनकाळ ओळखण्यासाठी दररोज निरीक्षण

दूध उत्पादन- लीटरमध्ये

  • प्रति म्हैस प्रति दिन दूध- १२ ते १५ 
  • रोजचे एकूण संकलन- १०५  
  • गायीच्या दुधाचे संकलन- ६० 
  • दररोजचे एकूण दूध संकलन- १६० 

चाऱ्यासाठी राखीव क्षेत्र 
दुग्धव्यवसाय सुरू केल्यानंतर झपाटे यांनी ऊस घेणे थांबविले. शेतात संपूर्णपणे वर्षभर चारा पिके घेण्यास सुरुवात केली. शिवाय दररोज एका नर्सरीतून दररोज पाचशे किलो उसाच्या कांड्या चाऱ्यासाठी घेण्यात येतात. एक रुपये प्रति किलो असा त्याचा दर आहे.  

कुशल आर्थिक नियोजन 
व्यवसायाची उभारणी करताना १३ लाख रुपयांचे स्वभांडवल वापरले. दूधसंस्थेमार्फत १७ लाखांचे कर्ज काढले. केवळ संस्थेला दूध पुरवठा केला तर कर्ज फेडण्यासाठी खूप अवधी गेला असता. हा व्यवसायही फायदेशीर झाला नसता. ही बाब लक्षात घेऊन शेजारील गावातील गवळ्यांशी संपर्क साधला.विक्रीदर ठरवून घेतला. दूध संस्थेपेक्षा प्रति लीटरला तो दहा ते बारा रुपयांनी जास्त होता. जादा रक्कम मिळावी यासाठी गवळ्याला दररोज ४० लीटर पुरवठा सुरू केला. संस्थेपेक्षा यातून दररोज चारशे रुपयांपर्यंत जादा रक्कम मिळू लागली. दुसरीकडे संस्थेकडे महिन्याला ३३ हजार रुपयांपर्यंतचा हप्ता सुरू होता. त्याची जुळणी व्हावी यासाठी संस्थेला म्हशीचे उर्वरित व गायींचे असे ७५ लीटरपर्यंत दूध पुरवण्यात येऊ लागले. यातून नफा व कर्जफेडीचा मेळ साधला. चार वर्षात सुमारे सात लाख रुपयांची कर्जफेड केली आहे.

घेतलेल्या जनावरांपासून तुम्ही वंशवृद्धी करीत राहिले पाहिजे. हा असा व्‍यवसाय आहे की एका जनावराची दोन, त्यातून चार अशी वृद्धी होत जाते. कमी भांडवलात नफा वाढत जातो. सुरुवातीची वर्षे मात्र नफ्याची अपेक्षा न करता संयम बाळगायला शिकले पाहिजे.आमच्या गोठ्यातच नऊ म्हशींची पैदास केली. कष्ट वेचण्याची तयारी हवी. यश मिळतेच.   
- सदाशिव झपाटे, ९९६०१३३२३३

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT