ताजी फळं आणि भाज्यांसाठी Esakal
अ‍ॅग्रो

फळं-भाज्या ताज्या ठेवण्यासाठी Refrigerator ची आवश्यकता नाही, इंजिनियर तरुणाने शोधला कोल्ड स्टोरेजला स्वस्त पर्याय

कोल्ड स्टोअरेज अभावी छोट्या शेतकऱ्यांचं किंवा फळं आणि भाजी विक्रेत्यांचं मोठं नुकसान होतं. शेतकऱ्यांची Farmers हीच समस्या लक्षात घेत चेन्नईच्या दीपक राजमोहन या इंजिनियर तरुणाने शेतकऱ्यांसाठी एक स्वस्त पर्याय शोधून काढला आहे

Kirti Wadkar

भारतात मोठ्या प्रमाणात फळं आणि भाज्यांचं उत्पादन होतं. असं असलं तरी केवळ ३० ते ४० टक्के उत्पादन हे ग्राहकांपर्यंत पोहचू शकतं. यामागचं कारण म्हणजेच फळं आणि भाज्या या नाशवंत असल्याने त्या ग्राहकांपर्यंत पोहचण्यापूर्वीच खराब होतात. Chennai Engineer innovated powder to keep fruits and vegetables fresh without refrigeration

त्यामुळे एकतर भाज्या फेकून द्याव्या लागतात किंवा अगदी कमी दरामध्ये त्याची विक्री करावी लागते. कोल्ड स्टोअरेज Cold Storage किंवा फळं आणि भाज्यांच्या साठवणुकीसाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं. कोल्ड स्टोअरेजचे पर्याय काही ठिकाणी उपलब्ध असले तरी छोट्या शेतकऱ्यांना आपला माल ठेवण्यासाठी हे पर्याय परवडणारे नसतात.

त्यामुळे यात खास करून छोट्या शेतकऱ्यांचं किंवा फळं आणि भाजी विक्रेत्यांचं मोठं नुकसान होतं. शेतकऱ्यांची Farmers हीच समस्या लक्षात घेत चेन्नईच्या दीपक राजमोहन या इंजिनियर तरुणाने शेतकऱ्यांसाठी एक स्वस्त पर्याय शोधून काढला आहे.

शेतकऱ्यांना आणि विक्रेत्यांना फळं-भाज्या जास्त काळ बिना फ्रिज किंवा कोल्ड स्टोअरेज ताज्या ठेवाता याव्यात यासाठी दीपकने नवनिर्मिती केली. दीपकचं अॅग्रिकलचर अँड फूड सायन्समध्ये इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण झालंय. काही वर्ष त्याने अमेरिकेमध्ये नोकरी केली. २०१९ सालामध्ये दीपक भारतात परतला. त्यानंतर त्याने भारतातील शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला.

फळं-भाज्या ताज्या ठेवण्यासाठी तयार केली पावडर

दीपकने चेन्नईमधील त्याच्या लॅबमध्ये प्लांट बेस्ड पावडर म्हणजेच एक नैसर्गिक पावडर तयार केली. या पावडरच्या लहान लहान आकाराच्या पुड्या तयार करण्यात आल्या. या पुड्या फळं किंवा भाज्यांमध्ये ठेवल्याने बिना फ्रिजही त्या ताज्या राहू शकतात.

मित्रासोबत सुरु केलं स्टार्टअप

दीपकने काही शेतकऱ्यांसोबत त्यांच्या शेतमालावर या पावडरच्या पुड्यांचा प्रयोग केला. या पुड्यांमुळे भाज्या किंवा फळं जवळपास १२ दिवस ताजी राहू शकतात. त्यानंतर हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दीपकने याला प्राॅडक्टचं स्वरूप दिलं आणि शेतकऱ्यांसाठी हे प्राॅडक्ट तयार करण्याचा निर्णय धेतला. त्याने बालपणीचा मित्र विजय आनंदसोबत स्टार्टअप Start Up सुरु केलं. ग्रीनपॉड लॅब्स Greenpod Labs असं त्याने त्यांच्या कंपनीला नाव दिलं.

ग्रीनपॉड लॅब्स नावानेच त्यांनी या नैसर्गिक पावडरच्या पाकिटांची निर्मिती सुरू केली.

वेगवेगळ्या उत्पादनांसाठी वेगवेगळ्या मापाची पाकिटं तयार केली जातात. या पाकिटांच्या किमतीदेखील वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच १ किलो आंब्यांसाठी ५ रुपयांचं पाउच ठेवलं जाऊ शकतं. तर १ किलो सिमला मिरचीसाठी ४ रुपयांचं पाउच आणि १ किलो टोमॅटोसाठी १.२५ रुपयांचं पाऊच ठेवू शकतो. यामुळे फळं आणि भाज्या ग्राहकांपर्यंत पोहचेपर्यंत सहज ताज्या राहू शकतात.

१५ लोकांना दिला रोजगार

दीपक आणि विजय यांनी सुरु केलेल्या ग्रनीपॉड लॅब्स या स्टार्टअपमुळे १५ लोकांना रोजगार देखील मिळाला आहे. चेन्नईमध्येच ते या उत्पादनांची निर्मिती करतात. तर प्राॅडक्टची विक्री करण्यासाठी त्यांनी वेबसाईट तयार केली असून या वेबसाईटवरून ते प्राॅडक्टची विक्री करतात.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT