नवी दिल्ली ः ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाच्या सचिवांनी केंद्रीय सचिवांना कांद्याचे दर आणि उपलब्धतेबाबत अवगत केले आहे. तसेच देशातंर्गत कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी दुबई आणि अन्य देशांमधून कांदा आयात करण्याची विनंतू एन. एम. टी. सी. ला करण्यात आली आहे.
दिल्ली आणि राजस्थान सरकार व बाजार समित्यांना उद्यापासून 12 नोव्हेंबरपर्यंत बाजार खुला ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. ग्राहक व्यवहार विभाग देशातल्या कांद्यांचे दर आणि उपलब्धतेवर लक्ष ठेऊन आहे. विभागाच्या सचिवांनी उच्चस्तरीय बैठकीत कांद्याच्या सद्यस्थितीबाबत तसेच यासंबंधी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. काद्यांची उपलब्धता वाढविणे आणि किंमती नियंत्रणात आणण्यासाठी निर्णय घेतले आहे. त्यानुसार एन. एम. टी. सी., नाफेड आणि कृषी आणि ग्राहक विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथकाला कांदा आयातीसाठी तुर्की आणि इजिप्तचा दौरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दिल्लीत साडेतीन हजार अन् मुंबईत पाच हजाराचा भाव
(क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)
कांद्याने मुंबईत क्विंटलला तीनशे रुपयांनी उसळली घेतली असून आज पाच हजार क्विंटल असा भाव राहिला. दिल्लीत घाऊक बाजारपेठेत साडेतीन हजार रुपयांवरुन अधिक भावाने कांदा विकला गेलायं. जयपूरमध्ये 3 हजार 600 रुपये क्विंटल असा भाव निघाला.
बाजारपेठ आज काल (ता. 7)
लखनऊ 4 हजार 400 4 हजार 250
आग्रा 4 हजार 250 3 हजार 250
इंदूर 3 हजार 800 3 हजार 500
मनमाड 4 हजार 200 3 हजार 250
सटाणा 4 हजार 650 4 हजार 625
सूरत 4 हजार 125 4 हजार 250
येवला 4 हजार 788 4 हजार 100
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.