Department of Agriculture E-Peek Pahani improved app available for farmers from august 1e-peak inspection sakal
अ‍ॅग्रो

E-Peek Pahani : ई-पीक पाहणीसाठी आता सुधारित मोबाईल ॲप

कृषी विभागाकडून विकसित : येत्या सोमवारपासून कार्यान्वित होणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कृषी विभागाकडून ई-पीक पाहणीसाठी सुधारित मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या नव्या ॲपमध्ये मागील वर्षभरात आलेले अनुभव आणि स्थानिक पातळीवरून शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे बदल करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना वापरण्यासाठी आता हे ॲप अत्यंत सोपे व सुलभ झाले आहे. येत्या सोमवारपासून (ता.१ आॅगस्ट) शेतकऱ्यांना वापरासाठी हे ॲप उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या सुधारित मोबाईल अॅपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील, त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर स्पष्टपणे दिसू शकणार आहे. पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून शेतकरी खूप दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल अॅपमध्ये दिसणार आहे. यामुळे पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही, जागच्या जागीच कळू शकणार आहे.

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत या प्रणालीमध्ये स्वयंघोषणापत्र घेतले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानली जाणार आहे. याची रीतसर नोंद गाव नमुना नंबर १२ मध्ये होणार आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत केली जाणार आहे. यापूर्वीच्या मोबाईल अॅपमध्ये असलेल्या मुख्य पीक व अन्य दोन दुय्यम पिके नोंदविण्याची सोय होती. आता या नव्या ॲपमध्ये दोनऐवजी तीन दुय्यम पिके नोंदविता येणार आहेत. शिवाय दुय्यम पिकांच्या लागवडीची तारीख, हंगाम व क्षेत्रसुद्धा नोंदविण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

शेतकऱ्यांनो, पीक पेरा नोंदवा

प्रत्येक खातेदाराने आपापला पीक पेरा या ई-पीक पाहणी अॅपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे. कारण ई-पीक पाहणीच्या नोंदी याच पीक विमा व पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे आदी बाबींसाठी वापरल्या जाणार आहेत.

येत्या सोमवारपासून पीक पाहणी सुरु होणार

यंदाच्या खरीप हंगामातील पिकांची ई-पीक पाहणीची सुरवात येत्या सोमवारपासून (ता.१ आॅगस्ट) सुरु होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अॅप व्हर्जन-२ हे गूगल प्ले स्टोअरवरून उपलब्ध करून घेणे आवश्‍यक आहे. सर्व शेतकऱ्यांनी सुधारित मोबाईल अॅप आपापापल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे आणि पीक पाहणी मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT