file photo Sakal
अ‍ॅग्रो

Agro: सौर कृषिपंप योजनेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला दहा व पाच टक्के रक्कम अदा करावी लागणार आहे.

बाबासाहेब कदम

नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ‘महाऊर्जा’द्वारे राबविण्यात येत असलेल्या सौर कृषिपंप ‘कुसुम’ योजनेसाठी राज्यभरात एक लाखाच्या आसपास अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला दहा व पाच टक्के रक्कम अदा करावी लागणार आहे. (Agriculture Farmer Scheme)

रजिस्ट्रेशन झालेला जो लाभार्थी ही रक्कम पहिल्यांदा देईल, त्यास प्रथम कृषिपंपाचे वाटप होणार आहे. दर वर्षी एक लाख कृषिपंप वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. ‘पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान’ (प्रधानमंत्री कुसुम योजना)च्या नावाखाली काहीजण शेतकऱ्यांकडून सौरपंपासाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासह नोंदणी फी आणि पंपाची किंमत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अनेक बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही बनावट वेबसाइट ‘.org’, ‘.in’, ‘.com’ अशा डोमेन नावांमध्ये नोंदणीकृत आहेत.

पात्रतेसाठी निकष

  • अटल सौर कृषिपंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत अर्ज मंजूर न झालेले अर्जदार

  • कूपनलिका, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाला जवळ असणे आवश्यक

  • शेतामध्ये तळे किंवा पाण्याचा शाश्‍वत स्रोत असणे आवश्यक

  • ज्या शेतकऱ्यांची शेती दुर्गम भागात आहे व ज्या ठिकाणी वीजजोडणी उपलब्ध नाही असे शेतकरी

योजनेची वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांत पारेषणविरहित दोन हजार ८५० कृषिपंपाची स्थापना करण्यात येणार असल्याने दिवसाही पिकांना पाणी देता येणे शक्य. शिवाय शेतकऱ्यास स्वखर्चाने इतर उपकरणेही त्याला जोडता येणार

  • सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यासाठी कृषिपंप किमतीच्या दहा टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के हिस्सा

  • शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीनुसार मिळणार सौरपंप. त्यात, २.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी तीन एचपी डीसी, पाच एकर शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एचपी डीसी, पाच एकरपेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५ एचपी, तसेच अधिक क्षमतेच्या सौर कृषिपंपासाठी यासाठी अनुदान देण्यात येईल.

आवश्यक पात्रता

  • अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा

  • स्वयं-गुंतवणुकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही

  • अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित क्षमतांच्या प्रमाणात दोन मेगावॉट क्षमतेसाठी अर्ज करू शकतो

  • या योजनेंतर्गत शेतकरी ०.५ मेगावॉट ते दोन मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करू शकतात

‘कुसुम’ योजनेच्या माध्यमातून सौरपंप घेण्यासाठी राज्यभरातून शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शासनाकडून ‘महाऊर्जा’कडे जसा निधी येईल त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात विभागाकडून सौरपंप वितरित करण्यात येतील. शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करताना काळजी घ्यावी. चुकीची कागपत्रे अपलोड करू नयेत. शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी कुठल्याही कर्मचारी- अधिकाऱ्यांना भेटण्याची गरज नाही.

- हेमंत कुलकर्णी, विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा, नाशिक विभाग

आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड पासपोर्ट साईज फोटो रेशनकार्ड नोंदणी प्रत

  • प्राधिकरण पत्र जमीन प्रत मोबाईल नंबर

  • चार्टर्ड अकाउंटटचे नेटवर्थ प्रमाणपत्र बँक खाते विवरण

पिकांना पाणी देण्यासाठी २४ तास वीज राहील. वीजबिल वाचेल व आर्थिक लाभ होईल. याच पैशांतून शेतकऱ्याला त्याच्या इतर गरजा पूर्ण करता येतील.

- ईश्‍वर फणसे, कुसुम सौरपंप लाभार्थी, बाणगाव बुद्रुक (जि. नाशिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT