Maharashtra Krishi Din eSakal
अ‍ॅग्रो

Maharashtra Krishi Din : शेतीला द्या तंत्रज्ञानाची जोड; शेतकऱ्यांना फायद्याचे ठरतील हे मोबाईल अ‍ॅप्स

महाराष्ट्रात १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

Sudesh

महाराष्ट्रात १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज कृषी दिन साजरा करण्यात येतो.

भारत देश हा कृषीप्रधान आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. जगाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणंही गरजेचं आहे. त्यामुळेच, शेतीसाठी उपयोगी येणारे काही मोबाईल अ‍ॅप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अ‍ॅग्री अ‍ॅप

गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध असणारं हे अ‍ॅप (Agri App) शेतकऱ्यांच्या भरपूर फायद्याचं आहे. फार्मिंग इनपुट-आऊटपुट, सरकारी सेवा या सगळ्या एकाच ठिकाणी आणण्याचं काम हे अ‍ॅप करतं. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी तज्ज्ञांशी चॅट करू शकतात. तसेच शेतीसंबंधी कित्येक व्हिडिओ या अ‍ॅपवर उपलब्ध आहे. याला एक लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं आहे.

इफको किसान अ‍ॅप

Iffco Kisan App हे साईजला छोटं, पण कामाला मोठं असं अ‍ॅप आहे. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या या अ‍ॅपमध्ये शेतीचे सल्ले, मंडई दर आणि टिप्स दिले जातात. यासोबतच यात हवामानाचा अंदाज, शेती विषयक अलर्ट हे तब्बल १० भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्येही तुम्ही तज्ज्ञांचे सल्ले घेऊ शकता.

पीएम किसान अ‍ॅप

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंबंधी कोणतीही माहिती हवी असल्यास या अ‍ॅपची मदत होते. लाभार्थी शेतकऱ्यांना ऑनलाईन जोडण्याचे कामही हे अ‍ॅप करते. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी किसान सन्मान निधी योजनेत नावनोंदणी करू शकतात. तसेच, जुने लाभार्थी आपलं अकाउंट स्टेटस पाहू शकतात.

पशु पोषण अ‍ॅप

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने हे अ‍ॅप तयार करण्यात आलं आहे. यामध्ये डेअरी फार्मिंग आणि पशुपालनासंबंधी माहिती देण्यात येते. प्राण्यांची प्रोफाईल, वय, दूध उत्पादन अशा गोष्टींबाबत आणि पशुंच्या पोषण आणि आहाराची माहिती दिली जाते.

अ‍ॅग्री मीडिया व्हिडिओ अ‍ॅप

Agri Media Video App या अ‍ॅपला गुगल प्ले स्टोअरवर ४.८ रेटिंग मिळालं आहे. नावात दिल्याप्रमाणे या अ‍ॅपमध्ये शेतीशी संबंधित कित्येक व्हिडिओ देण्यात आले आहेत. शेतकरी तज्ज्ञांशी चर्चा करून शेतीसंबंधी सल्ले घेऊ शकतात. यासोबतच यामध्ये शेतीचे यशस्वी प्रयोग, नवीन तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, शेतीसंबंधी बातम्या, सरकारी योजना या गोष्टींसंबंधित व्हिडिओ देण्यात आले आहेत.

फार्मबी

FarmBee हे अ‍ॅप भारतातील दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. पिकाच्या प्रत्येक टप्प्याबाबत आवश्यक ती माहिती या अ‍ॅपमध्ये मिळते. यामध्ये पिकांचे ४५० हून अधिक प्रकार, १३०० हून अधिक मार्केट आणि ३५०० हून अधिक ठिकाणांचे हवामान याची माहिती उपलब्ध आहे.

किसान योजना

Kisan Yojana या अ‍ॅपवर नावात दिल्याप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या असणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT