एव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” हा एक संसर्गजन्य रोग असून, सर्व प्रकारच्या पक्ष्यांमध्ये संक्रमित होतो. हा रोग ‘एच ५ एन १’ या विषाणूमुळे होतो. यात पक्ष्यांची मरतूक ८० ते १०० टक्क्यांपर्यंत होते. या पार्श्वभूमीवर कोंबड्यामध्ये ‘बर्ड फ्लू’चे संक्रमण रोखण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपायांची माहिती घेऊ.
कोविड -१९ प्रादुर्भावाने संपूर्ण देश आधीच त्रस्त असताना देशाच्या विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’ (एच ५ एन १) मुळे पक्षी मृत झाल्याच्या बातम्या आल्या. यात हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, केरळ, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा राज्यांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर सन १८७८ मध्ये सुमारे १४० वर्षांपूर्वी उत्तर इटली येथे या रोगाची पहिली नोंद करण्यात आली आहे.
भारतात बर्ड फ्लू हा सर्वप्रथम १८ फेब्रुवारी २००६ मध्ये महाराष्ट्रातील नवापूर (जि. नंदुरबार) येथे आढळला होता.
एव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” हा एक संसर्गजन्य रोग असून, सर्व प्रकारच्या पक्ष्यांमध्ये संक्रमित होतो. हा रोग ‘एच ५ एन १’ या विषाणूमुळे होतो. यात पक्ष्यांची मरतूक ८० ते १०० टक्क्यांपर्यंत होते. बर्ड फ्लू प्रादुर्भावाविषयी समजताच सध्या महाराष्ट्रातील सुमारे २५ टक्के मांस व अंडी विक्रीमध्ये घट झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर कोंबड्यामध्ये ‘बर्ड फ्लू’चे संक्रमण रोखण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपायांची माहिती घेऊ.
बर्ड फ्लू कशामुळे होतो?
बर्ड फ्लू हा रोग आर्थोमिक्झो व्हायरस या विषाणूमुळे होतो. या विषाणूच्या रचनेवरून त्यांचे टाइप ए, टाइप बी, टाइप सी आणि टाइप डी असे वर्गीकरण केले जाते. एन्फ्लूएन्जा टाइप ए हा विषाणू कोंबड्यासाठी अतिशय घातक असतो. या विषाणूच्या बाह्य आवरणावर १८ प्रकारची हिमएग्लूटीनीन(एच) व ११ प्रकारची न्युरामिनिडेज (एन) नावाची प्रथिने असतात.
एखाद्या विषाणूवर कोणत्या प्रकारची प्रथिने असतात, त्यानुसार त्यांचे उपवर्ग ठरतात. उदा. एच १ एन १; एच १ एन ८; एच २ एन९, एच३ एन२, एच ५ एन१, एच ५ एन८; एच ५ एन९, एच ६ एन २ अशा प्रकारे सुमारे १४४ उपवर्गात त्यांचे वर्गीकरण करता येते. भारतात आलेला बर्ड फ्लू हा रोग ‘एच ५ एन १’ या विषाणूंमुळे संक्रमित झाला आहे.
बर्ड फ्लूचा प्रसार कसा होतो?
जलाशयातील जंगली पक्षी हे सर्व एव्हीयन इन्फ्लूएन्झा ए (बर्ड फ्लू) व्हायरसचा नैसर्गिक स्रोत मानला जातो. बहुतेक संक्रमित पक्षी संसर्गजन्य विषाणू मोठ्या संख्येने बाहेर टाकत असतानाही कोणतीही लक्षणे दाखवत नाहीत. लक्षणे न दर्शवता हे पक्षी विषाणूचे ‘मूक’ स्रोत म्हणून काम करतात. ते इतर पक्ष्यांपर्यंत प्रादुर्भाव पोहोचवतात. पाळीव जलाशय पक्षी (उदा. बदके, हंस इ.) हे जंगली जलाशयातील पक्ष्यांच्या संपर्कात आल्याने संक्रमण होऊ शकते. त्यांच्यामार्फत पाळीव देशी कोंबड्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होतो. सामान्यत: वन्य पक्ष्यांमधून कमी तीव्रतेचा रोगकारक विषाणू संक्रमित झाला असला, तरी पाळीव पक्ष्यामध्ये तो आपले स्वरूप बदलू शकतो. अत्यंत रोगजनक एव्हीयन इन्फ्लूएंझाचा (बर्ड फ्लू) प्रादुर्भाव होऊ शकतो.
कोंबड्यांतील बर्ड फ्लूची लक्षणे
कोंबड्यांमध्ये फ्लूची लक्षणे तीव्र स्वरूपात दिसून येतात. या विषाणूचा रोग निर्माण करण्याचा काळ काही तास ते १४ दिवस एवढा असतो. कोंबड्या काही तासातच किंवा एक दोन दिवसांत मृत्युमुखी पडतात.
कोंबडीचे मांस व अंडी खाणे सुरक्षित आहे का?
परसबागेतील, देशी पक्ष्यांची काळजी
प्रतिबंधात्मक उपाय
बर्ड फ्लू नियंत्रित जैव-सुरक्षाविषयक उपाययोजनांचे कडकपणे पालन केले पाहिजे.
पक्षी सध्या संक्रमित नसले तरी सर्व कुक्कुटपालकांनी आपल्या फार्मवर प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत.
- डॉ. एम. आर. वडे, ८६००६२६४००
(सहायक प्राध्यापक, कुक्कुट संशोधन केंद्र, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.)
Edited By - Prashant Patil
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.