shivapur 
अ‍ॅग्रो

कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर गावाने ओळख

गोपाल हागे

अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा बीजोत्पादनात ओळख तयार केली आहे. एकरी दोन ते चार क्विंटल उत्पादनासह चांगला दर मिळवत गावातील शेतकऱ्यांनी या पीकपद्धतीतून अर्थकारण उंचावले आहे. 

शिवापूर (ता. जि. अकोला) गाव कबड्डी खेळासाठी प्रसिद्ध आहे. तरीही गावचे अर्थकारण शेतीशीच निगडीत आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा, गहू ही गावची हंगामी आहेत. सुरुवातीला केवळ चार विहिरींच्या माध्यमातून गावच्या शेतीला सिंचन व्हायचे. प्रयोगशीलतेकडे वळलेल्या या गावात आता विहिरींची संख्या ५४ वर पोचली आहे. काही शेतकऱ्यांनी कूपनलिकांच्या माध्यमातून सिंचनाची शाश्वत सोय केली. काही शेतकरी ठिबक सिंचनाकडे वळले आहेत. वैकुंठ ढोरे, पंजाबराव ढोरे, जयकुमार गढेकर, रमेश भलभल्ने यांनी पुढाकार घेत कांदा बीजोत्पादनाची पद्धत गावशिवारात रूढ करण्यास सुरुवात केली. त्यांचे अनुभव पाहून अन्य शेतकरी देखील त्याकडे वळले.

कांदा बीजोत्पादनाचा मिळालेला पर्याय 
तीन एकरांपासून सुरू झालेले कांदा बीजोत्पादन आज १५० एकरांपर्यंत पोचले आहे. गावातील युवा  शेतकरी उपलब्ध क्षेत्रानुसार दोन एकरांपासून पाच एकरांपर्यंत दरवर्षी लागवड करतात. गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात या पीकपद्धतीने मोठा हातभार लावला.  नवी घरे, दुचाकी,  चारचाकी वाहने गावात दिसू लागली आहेत. 

शेतकरी झाले संघटित 
शिवापूर येथे कांदा बीजोत्पादन गट स्थापन झाल्यापासून गावातील शेतकऱ्यांत नियमितपणे संवाद वाढला. पूर्वी शेतकरी कृषी केंद्र चालकाच्या सल्ल्यानुसार कीड नियंत्रण करायचे. आता एकमेकांत चर्चा करण्याबरोबर तज्ज्ञांचा सल्लाही घेतात. एकत्रित पीक नियोजन ठरवतात. तयार होणारे बियाणे शुद्ध व भेसळमुक्त असावे यासाठी एकाच वाणाची निवड करण्याचे सर्वानुमते ठरते. एखाद्याला पाण्याची कमतरता भासल्यास त्याच्या मदतीला अन्यजण धावून जातात. गावकऱ्यांच्या या उपक्रमाची दखल तत्कालीन  जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी घेतली. त्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आदींनीही सहकार्य केले. आत्माच्या माध्यमातून नाशिक येथील एनएचआरडीएफ संस्थेत अभ्यास दौराही घेण्यात आला. बीजोत्पादनाची शेतीशाळा आयोजित केली. डॉ. . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. . श्याम घावडे, कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ गजानन तुपकर, डॉ. . चारूदत्त ठिपसे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, कृषी सहायक ए. बी. करवते आदींचे सहकार्य लाभले आहे.  

कांदा बीजोत्पादन दृष्टिक्षेपात 
  एकरी दोन ते कमाल पाच क्विटंलपर्यंत उत्पादन 
  दर ३० ते ३५ हजार रुपये प्रति क्विंटल. 
  कंपन्यांना फायदा झाल्यास त्याचा बोनस शेतकऱ्यांना मिळतो. 
  सन २०१४ ते मागीलवर्षी पर्यंतचा अभ्यास केल्यास गावातील कांदा बीजोत्पादनाचे सरासरी क्षेत्र- ३५ एकरांपासून वाढत १५० एकरांपर्यंत 
  शिवापूरसह म्हैसपूर, चांगेफळ, कान्हेरी, सरप, चांदूर, कापशी, चिखलगाव, सुकळी, माझोड, मासा, कुंभारी या गावांतही क्षेत्र विस्तार. सर्व मिळून ३०० ते ३५० एकर क्षेत्र 

शेतकऱ्यांना प्रोत्साहन
बीजोत्पादनात मधमाश्यांचा वापर महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी प्रति मधुमक्षिका पेटीला ४२०० रुपये खर्च होतो. यासाठी २००० रुपये  अनुदान देण्यात आले -आत्मा यंत्रणेच्या माध्यमातून  कांदा बीजोत्पादनासाठी उत्कृष्ट शेतकरी गट म्हणून २० हजार रुपयांचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन  गौरविण्यात आले.

दीड ते दोन एकरांत लागवड असते. वातावरण अनुकूल राहिल्यास उत्पादनात वाढ होते. कांदा बीजोत्पादन क्षेत्राला पीकविम्याचे कवच मिळाले तर अनेक शेतकरी याकडे वळण्यास मदत होईल. अलीकडील वर्षांत नैसर्गिक संकटांचा सामना या पिकाला करावा लागला. बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी लागवड थांबविली होती. यंदा क्षेत्र पुन्हा वाढविणार आहोत.
— वैकुंठराव ढोरे, अध्यक्ष, गुरुकृपा शेतकरी स्वयंसहायता गट, शिवापूर   

चार-पाच वर्षांपासून सोयाबीनंतर सप्टेंबरच्या सुमारास कांदा बीजोत्पादन घेतो. दोन एकरांत लागवड असते. एकरी १५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन मिळते. दरवर्षी कंपन्यांचे वेगवेगळे दर निघतात. अन्य पिकांच्या तुलनेत कांदा बीजोत्पादन चांगले पैसे मिळवून देते.
— सुनील गोविंद सिरसाट, सचिव, ‘गुरुकृपा’  ९४२२९२०२६५ 

आठ वर्षांपासून दोन ते अडीच एकरात कांदा बीजोत्पादन घेतो. दरवर्षी एकरी साडेतीन ते पाच क्विंटल  उत्पादन मिळते. मागील दोन वर्षात मधमाश्यांचे प्रमाण कमी झाल्याने उत्पादनात घट झाली. 
— केशवराव ढोरे, शिवापूर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT