Nashik Teachers Constituency Election 2024 Sakal
अहिल्यानगर

Nashik Teachers Constituency Election 2024 : ‘शिक्षक मतदार’साठी उद्या मतदान; निवडणूक रिंगणात २१ उमेदवार

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निर्मिती १९८८ मध्ये झाली. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस शिक्षकांना मतदार नोंदणी करावी लागते.

सकाळ वृत्तसेवा

Ahmednagar News : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (ता.२६) मतदान होत आहे. जिल्ह्यात १७ हजार ३९२ मतदार असून, २० मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्र अधिकाऱ्यांना मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्य वाटप केले जाणार आहे. या निवडणुकीत २१ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने चुरस वाढली आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निर्मिती १९८८ मध्ये झाली. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस शिक्षकांना मतदार नोंदणी करावी लागते. माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्थांतील शिक्षक मतदार आहेत.

नाशिक विभागात ६९ हजार ३६८ मतदार आहेत. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील मतदारांची संख्या मोठी आहे. नाशिक जिल्ह्यात २५ हजार ३०२ मतदार असून, त्याखालोखाल नगर जिल्ह्यात १७ हजार ३९२ मतदार आहेत. जळगाव जिल्ह्यात १३ हजार १२२, धुळे जिल्ह्यात ८ हजार १५९, तर नंदुरबार जिल्ह्यात ५ हजार ३९३ मतदार आहेत.

या निवडणुकीत शिक्षक संघटनांचे नेतेच उमेदवारी करत होते. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. या पक्षांचे राज्य पातळीवरील नेते उमेदवाराच्या प्रचारासाठी आल्याने चुरस वाढली आहे. मतदानाच्या अगोदर दोन दिवस जाहीर प्रचार थांबवावा लागतो. त्यानुसार सोमवारी (ता.२४) सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली.

तालुकानिहाय महिला, पुरुष मतदार

अकोले- २६९ (७५८)ः १ हजार २७, संगमनेर- ७४५ (१ हजार ७१४)ः २ हजार ४५९, राहाता- ८९८ (१ हजार २५३) ः २ हजार १५१, कोपरगाव- ७८८ (१ हजार ४१९)ः २ हजार २०७, श्रीरामपूर- ३८८ (६४०)ः १ हजार २८, नेवासे- २५६ (८९६)ः १ हजार १५२, शेवगाव- १९८ (७१९) ः ९१७, पाथर्डी - १९८ (७४९) ः ९४७,

राहुरी - ३०४ (७११) ः १ हजार १५, पारनेर- १९० (५३९) ः ७२९, नगर शहर- ७८९ (८६८) ः १ हजार ६५७, नगर ग्रामीण - १४६ (४४८)ः ५९४, श्रीगोंदे- २४५ (६६४) ः ९०९, कर्जत- १५६ (४८५)ः ६४१, जामखेड- ७० (२७९) ः ३४९. जिल्ह्यात १७ हजार ३९२ मतदार आहेत. संगमनेर सर्वाधिक २ हजार ४५९ मतदार आहेत. जामखेड तालुक्यात सर्वात कमी ३४९ मतदार आहेत.

मतपत्रिका आज मतदान केंद्रांवर

या निवडणुकीसाठी मतपत्रिकेवर मतदान होते. मतदारांना पसंती क्रमांकाद्वारे मतदान करावे लागते. मतपत्रिका आणि मतदानासाठीचे साहित्य वाटपासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात उद्या सकाळी १० वाजता मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

त्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाकडून मतपत्रिका आणि मतदानासाठी लागणारे साहित्याचे वाटप होणार आहे. सायंकाळपर्यंत मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहचली. तहसीलदार हे मतदान केंद्र प्रमुख तर वर्ग दोनचे अधिकारी हे मतदान प्रक्रियेतील अन्य जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत.

नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्याकडे आचारसंहितेच्या अनुषंगाने काही तक्रारी आल्या आहेत. पैठणी, सफारी आणि सोन्याच्या नथींचे वाटप केले जात असल्याचे या तक्रारींमध्ये म्हटले आहे.

त्यांनी सर्व जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाईचे निर्देश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर शिक्षणाधिकाऱ्यांना ही कारवाईचे निर्देश दिले आहेत.

- राजेंद्रकुमार पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT