अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात आज (मंगळवारी) दोन लाख २१ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. दिवसेंदिवस शाळांतील हजेरीपट वाढतो आहे. ‘आई, मला शाळेला जायचंय. जाऊ दे ना,’ असे संवाद ऐकू येऊ लागले आहेत. बच्चेकंपनी प्राथमिक शाळा उघडण्याची वाट पाहत आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या एकूण दोन हजार ३२ शाळा आहेत. त्यांमध्ये चार लाख २२ हजार १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या एक हजार ७६६ शाळा सुरू आहेत. त्यांमध्ये एक लाख ७१ हजार ५९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शहरी भागात पाचवी ते बारावीच्या एकूण २७४ शाळा आहेत. त्यांमध्ये एक लाख १९ हजार ३९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या २४१ शाळा सुरू असून, त्यांमध्ये ५० हजार २३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले होते. मात्र, त्याला विद्यार्थी कंटाळले होते. आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. त्यास विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शाळा सुरू करण्याबाबतचे नियोजन शिक्षण विभागातर्फे अगोदरपासूनच करण्यात आले होते. त्याचा फायदा शाळा सुरू झाल्यानंतर झाला आहे. आज जिल्ह्यात दोन हजार सात शाळा सुरू आहेत. त्यांमध्ये दोन लाख २१ हजार ८३४ विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळाही सुरू करण्याबाबत जिल्ह्यात तयारी सुरू आहे. शासनाचा आदेश येताच त्या सुरू होतील.
- भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
जिल्ह्यातील शाळा
पाचवी ते बारावी : २३०६
एकूण विद्यार्थी : ५४१५१२
सुरू झालेल्या शाळा : २००७
उपस्थित विद्यार्थी : २२१८३४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.