नेवासे वृक्षारोपण 
अहिल्यानगर

गडाख परिवाराने अकरा गावांत केली साडेतीन हजार रोपांची लागवड

प्रा. सुनील गर्जे

नेवासे : वटपौर्णिमा हा सण वटवृक्षांची पूजा करून महिला भगिनी नेहमी साजरा करतात. परंतु कोरोनाच्या संकटाने मोफत असलेल्या ऑक्सिजनचे महत्व सर्वांना पटवून दिले. निसर्ग वाचला तर सृष्टी वाचेल या भावनेतून वटसावित्री पौर्णिमेला एक झाड लावून त्याचे संवर्धन करा असे आवाहन महिला बचत गट चळवळीच्या नेत्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.(3,000 trees planted under the initiative of Sunita Gadakh)

वटपौर्णिमेनिमित्त नेवासे तालुक्यातील अकरा गावांत शारदाताई फाऊंडेशनच्या वतीने निसर्ग संवर्धनासाठी "एक झाड लावुया" उपक्रमांतर्गत सुमारे तीन हजार शंभर वृक्ष रोपांचे रोपण करण्यात आले. त्याचा प्रारंभ वृक्षरोपांचे वाटप व वृक्षारोपण माजी सभापती सुनीता गडाख, नगर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडे-कोकाटे, उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी गडाख बोलत होत्या.

यावेळी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वटपूजनास आलेल्या महिलांना झाडांची अनोखी भेट देऊन व वृक्षांचे महत्व सांगून शारदाताई फाउंडेशनच्या वतीने नेवासे तालुक्यात वृक्षरोपणास व संवर्धनास प्रोत्साहन देणारी वटसावित्री पौर्णिमा साजरी करत वृक्षसंगोपनाची शपथ घेण्यात आली. दरम्यान, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान दत्तकग्राम मोरया चिंचोरे येथेही शारदाताई फौंडेशनच्या वतीने अकरा वटवृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नेवासे तालुक्यातील विविध गावामध्ये वृक्षवाटप उपक्रम प्रसंगी शारदाताई फाउंडेशनच्या या अभियानात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे वटपौर्णिमा निमित्त भेट म्हणून देण्यात आलेल्या वृक्षांचे महिलांनी आपल्या घराच्या प्रांगणात, शेता, बांधावर वृक्षारोपन केले. आणि त्याचा सेल्फी काढून आनंद लुटला.

११ गावांत ३१०० वृक्षरोप वाटप

नेवासे तालुक्यातील नेवासे शहर, खरवंडी, सलाबतपुर, मक्तापुर, सोनई, माका, चांदे, कुकाणे, जळके बुद्रुक, प्रवरासंगम, भानसहिवरे या अकरागावांमध्ये ३ हजार १०० विविध वृक्षांचे वाटप करण्यात आले. यामध्ये वड, कडुनिंब, चिंच, करंज, गुलमोहर, शीसम, नारळ, जांभूळ, आंबा आदी वृक्षांचा समावेश होता.

"शारदाताई फाउंडेशनने राबवलेला 'एक झाड लावूया'उपक्रम खूपच प्रभावी ठरला असून महिलांनी वटपौर्णिमा निमित्त केलेल्या वृक्षांचे संवर्धन करावे. या उपक्रमातुन झालेल्या वृक्षरोपणाचा फायदा दीर्घकाळ होणार आहे.

-कीर्ती जमदाडे-कोकाटे, विभागीय वनअधिकारी, सामाजिक वन विभाग नगर.

(3,000 trees planted under the initiative of Sunita Gadakh)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT