Radhakrishna Vikhe Patil Sakal
अहमदनगर

Radhakrishna Vikhe Patil : उद्योजकांना तातडीने जमीन हस्तांतरीत करा - राधाकृष्ण विखे

सकाळ वृत्तसेवा

Shirdi News : शिर्डी औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी शेती महामंडळाची पाचशे एकर जमीन औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यात आली. ही जमीन कुठलाही मोबदला न घेता हस्तांतरीत करण्यात आली. त्यामुळे उद्योजकांना अन्य औद्योगिक वसाहतीप्रमाणे मोठा मोबदला देऊन जमीन खरेदी करावी लागणार नाही.

ही जमीन मागणीनुसार तातडीने उद्योजकांना हस्तांतरीत करायची आहे. या परिसरातील काटेरी झुडपे काढून स्वच्छता मोहीम राबवावी. त्यामुळे उद्योजकांना जागेची पाहणी करणे सुलभ होईल, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

शिर्डी येथील नियोजित औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी आज विखे पाटील यांनी मुंबईत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उद्योग मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी संतोष भिसे, मुंबईचे भूमी व्यवस्थापक बप्पा थोरात यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

विखे म्हणाले, की या वसाहतीच्या उभारणीसाठी पाणी, रस्ते, वीज व जलनिःसारण या पायाभुत सुविधा कमीत कमी वेळात उभारायच्या आहेत. त्यासाठी विविध सरकारी विभागांच्या मंजुऱ्या घेण्याबाबत निश्चित कालावधीत आराखडा तयार करावा. आवश्यक त्या परवानग्या तातडीने मिळतील याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी.

काही अडचण आल्यास आपण पुढाकार घेऊन त्यातून मार्ग काढू. मात्र, कमीत कमी वेळात हे काम आपल्याला पूर्ण करायचे आहे. उद्योजकांना जागेची पाहणी करता यावी यासाठी साफसफाई करून घ्यावी. तेथे दिशादर्शक आणि सूचना फलक लावावेत. महत्त्वाच्या अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी पूर्वतयारी करावी.

शिर्डीची नियोजित औद्योगिक वसाहत समृध्दी महामार्गालगत आहे. नाशिक आणि मुंबई सोबत कमीत कमी वेळात दळणवळणाची सुविधा त्यामुळे उपलब्ध झाली आहे. विमानतळ व रेल्वेमार्ग आहे. जमीन स्वस्त दरात उपलब्ध आहे. त्यामुळे देशातील नामवंत उद्योजकांनी येथे विविध उद्योग सुरू करण्याबाबत उत्सुकता दाखवली आहे. प्रदूषण निर्माण होणार नाही, अशी औद्योगिक वसाहत उभारण्याचा आपला मानस आहे. या नियोजित औद्योगिक वसाहतीमुळे शिर्डीसह नगर जिल्ह्यात मोठी रोजगार निर्मिती होईल.

- राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT