Fraud Crime sakal
अहिल्यानगर

Fraud Crime : व्यापाऱ्यांची २१ लाखांची फसवणूक, गाळा देण्याचे आमिष; एकावर कोतवालीत गुन्हा दाखल

Fraud Crime : मार्केट यार्ड येथील गाळ्याची खरेदी देतो असे सांगून दोघा व्यापाऱ्यांकडून त्यांच्याच 5343नातेवाईकाने २१ लाख रुपये घेतले मात्र गाळ्याची खरेदी न देता संबंधित गाळा दुसऱ्याला विकाल तसेच घतलेले पैसे परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे

सकाळ वृत्तसेवा

अहिल्यानगर : मार्केट यार्ड येथील गाळ्याची खरेदी देतो, असे सांगून दोघा व्यापाऱ्यांकडून त्यांच्याच नातेवाईकाने २१ लाख रुपये घेतले. मात्र गाळ्याची खरेदी न देता संबंधित गाळा दुसऱ्याला विकाल. तसेच घतलेले पैसे परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशांत दिलीप झिंजुर्डे, दत्तात्रय बाळासाहेब झिंजुर्डे अशी फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.

प्रशांत झिंजुर्डे यांच्या फिर्यादीवरून त्यांचा नातेवाईक नीलेश चंद्रकांत खताळ (रा. खताळ गल्ली, हनुमान मंदिराच्या समोर, बुरुडगाव रस्ता, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झिंजुर्डे यांचे शहरातील नवीपेठेत कपड्याचे दुकान आहे. त्यांचा नातेवाईक नीलेश खताळ याचा मार्केट यार्डमधील मर्चन्ट बँकेच्या शेजारी गाळा होता. त्यात तो व्यवसाय करत होता. जानेवारी २०२४ मध्ये खताळ हा गाळा विकायचा म्हणून झिंजुर्डे यांच्याकडे आला. झिंजुर्डे यांनी गाळा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. खताळ व त्यांच्यात ३० लाख रुपयांत गाळ्याचा व्यवहार ठरला. ठरल्याप्रमाणे झिंजुर्डे बंधूंनी खताळला तीन लाख रुपये रोख स्वरूपात दिले.

त्यानंतर तीन चेकद्वारे नऊ लाख रुपये व दत्तात्रय झिंजुर्डे यांनी तीन चेकद्वारे नऊ लाख रुपये, असे एकूण २१ लाख रुपये खताळ याला दिले होते. यानंतर झिंजुर्डे बंधू खताळ याला फोन करून बाकी राहिलेले नऊ लाख रुपये घेऊन गाळा नावावर करून द्या, अशी वारंवार विचारणा करत होते. परंतु खताळ याने गाळा दुसऱ्यालाच विकला.

दरम्यान, दिलेल्या पैशांची वारंवार मागणी करूनही खताळ याने पैसे दिले नाहीत. त्यामुळे झिंजुर्डे बंधूंनी पोलिसांकडे धाव घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT