Accident Esakal
अहिल्यानगर

Ahmednagar News: खोदलेल्या रस्त्याने घेतला पितापुत्र- नातवाचा बळी; ट्रकने 150 फूट फरफटत नेलं

विलास कुलकर्णी

राहुरी : राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यान जोगेश्वरी फाट्यानजीक मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता नगर-मनमाड महामार्गावर भरधाव ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. ट्रकच्या चाकाखाली दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये पिता-पुत्र व चिमुरड्या नातवाचा समावेश आहे. (Accident in Ahmednagar by truck due to dumping road father son death)

प्रकाश मोहन ठोकळ (वय ६५), शुभम प्रकाश ठोकळ (वय २५, दोघेही रा. मुळगाव मोहोज खुर्द, ता. पाथर्डी हल्ली रा. भिंगार, ता. नगर) आणि प्रकाश ठोकळ यांच्या मुलीचा मुलगा सायरस प्रवीण जाधव (वय ५) अशी मृतांची नावे आहेत.

ठोकळ पिता-पुत्र व नातू दुचाकीवरून (एमएच १६ बीपी ९२०१) नगरच्या दिशेने चालले होते चालले होते. जोगेश्वरी फाट्याजवळ नगर-कोपरगाव रस्त्यावर एका बाजूला रस्ता उखडलेला असल्याने एकेरी वाहतुक सुरू आहे. एका वाहनाला ओव्हरटेक केलेल्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (एमएच १६ सीडी २०६६) जोराची धडक दिली. दुचाकी थेट ट्रकच्या पुढील चाकाखाली घुसली. दुचाकीवरील तिघेही जागीच ठार झाले. सुमारे दीडशे फूट दुचाकी फरफटत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

दरम्यान, घटनास्थळापासून एक हजार फूट अंतरावर सोमवारी अज्ञात ट्रकने एका दुचाकीला उडविले. त्यात, दुचाकी चालक मुलगा गंभीर जखमी झाला. दुचाकी वर मागे बसलेली त्याची आई जागीच ठार झाली. अवघ्या २४ तासात एकेरी वाहतुकीमुळे पुन्हा तीन बळी घेतले. त्यामुळे, नगर- कोपरगाव रस्ता आणखी किती बळी घेणार आहे. असा तीव्र संताप घटनास्थळी नागरिकांनी व्यक्त केला.

अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. राहुरी पोलिसांनी तातडीने मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात हलविले. वाहतूक पोलिसांनी वाहने कच्च्या रस्त्याने वळविली. त्यानंतर हळूहळू वाहतूक कोंडी कमी झाली. दीड तासाने वाहतूक सुरळीत झाली.

काम अर्धवट सोडून ठेकेदार पळाला!

"नगर-कोपरगाव रस्त्याच्या ठेकेदाराने अनेक ठिकाणी एका बाजूने रस्ता खोदलेला आहेत. अर्धवट काम सोडून ठेकेदाराने पळ काढला. त्यामुळे, ठिकठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. चालकांनी वाहने हळू चालवावी. एकेरी वाहतुकीत ओव्हरटेक करू नये." - सतीश घुले, सामाजिक कार्यकर्ते, राहुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT