श्रीरामपूर (अहमदनगर) : आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेच्या साथरोग नियंत्रण कार्यात अडथळा आणल्यास तसेच अफवा पसरविल्यास संबधितांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी सोशल मीडियावर पोलिस यंत्रणा लक्ष ठेऊन आहे. अफवा पसरवल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तीन महिन्यांपासुन प्रशासन विविध उपाययोजना राबवत असताना कोरोनाबाधित परिसर सील करुन परिसरातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गरजुना औषधाचे वाटप केले आहे. याच पार्श्चभूमीवर आरोग्य विभाग शहरातील प्रभाग दोन परिसरात नागरीकांची रॅपीड तपासणी करीत असताना काही नागरीकांनी त्यास विरोध दर्शविल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. सध्या संशयीताच्या घशातील स्त्राव तपासणी अहवालास विलंब होत असल्याने प्रशासनाने रॅपिड तपासणीची सुविधा उपलब्ध केली. तीन दिवसांपासुन प्रभाग दोन परिसरात आरोग विभाग रॅपीड तपासणी करीत असताना हा प्रकार घडला. काही नागरीकांनी रॅपीड तपासणीस विरोध दर्शविला. त्यामुळे शहरात अफवा पसरविल्यास शहराचे आरोग्य अडचणीत येईल. साथरोग नियंत्रणसाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित असुन नागरीकांनी त्यास सहकार्य करावे, अन्यथा अफवा पसरविल्यास कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
संपादन : अशोक मुरुमकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.