ADCC Bank gold scam: Fraud also took place in Tambhere 
अहिल्यानगर

एडीसीसी बँक सोने घोटाळा : सोनेगावात पडले पितळ उघडे, तांभेरेतही झाले मातेरे

विलास कुलकर्णी

राहुरी : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तांभेरे (ता. राहुरी) शाखेत एक सप्टेंबर २०१९ ते एक जानेवारी २०२० दरम्यान बनावट दागिने तारण ठेवून सोनेतारण कर्ज घेतलेल्या २० जणांवर २७ लाख दहा हजार रुपयांची बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी काल (मंगळवारी) राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

बँकेच्या सोनगाव पाठोपाठ तांभेरे शाखेत बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

सोनगाव शाखेतील बनावट सोने तारण कर्ज प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर अरुण नांगरे हाच तांभेरे शाखेत गोल्ड व्हॅल्युवर होता. त्यानेच संगनमताने घोटाळा केला आहे. तांभेरे शाखेत ९० जणांना सोनेतारण कर्ज वाटप केले होते. पैकी ३७ जणांच्या सोन्याची सत्यता पडताळणी २८ व ३० डिसेंबर २०२० रोजी झाली. त्यातील ३३ जणांचे तारण सोन्याचे दागिने बनावट आढळले.

१३ जणांनी बँकेच्या कर्ज व व्याजची काही रक्कम जमा केली. उर्वरित २० जणांनी एकही रुपया भरला नाही.  त्यांच्यावर बँकेचे शाखाधिकारी भाऊसाहेब वर्पे (वय ५९, रा. कोल्हार खुर्द) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.

प्रकाश गिताराम पठारे, पुजा नवनाथ पठारे, मंदाबाई गोपीनाथ पठारे, मनिषा राहुल पठारे, राहुल गोपीनाथ पठारे, नवनाथ गोपीनाथ पठारे, बाबासाहेब सखाहरी पठारे, राहुल शांताराम नालकर, अश्विनी बाळासाहेब पवार, रविंद्र बाळासाहेब पवार, संजय शंकर चिकणे (सर्वजण रा. लक्ष्मीवाडी, रामपूर) सुनिल उत्तम सरोदे, अनिल उत्तम सरोदे (रा. तांदुळनेर), प्रवीण अरुण शिरडकर, माया राजेंद्र येळे (दोघेही रा. कोल्हार खुर्द),  अरुण बाळासाहेब शिंदे (रा. रामपूर, हल्ली रा. पाथरे, ता. राहाता), शुभम अंबादास येळे (रा. कानडगांव, हल्ली रा. हनुमंतगांव, ता. राहाता), संदीप बाळासाहेब अनाप (रा. अनापवाडी, सोनगांव), पोपट काशिनाथ थोरात (रा. सात्रळ), गोरक्ष राधुजी जाधव (रा.माळेवाडी- डुक्रेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी पसार आहेत. पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT