milk sakal
अहिल्यानगर

अकोलेत गाईचे दुधात भेसळ...!

तेल व पावडर वापरून दुध तयार करुन तो करत होता दुधाचे संकलन...! अन्न व आैषध विभाग व अकोले पोलिसांची संयुक्त कारवाई ..!

सकाळ वृत्तसेवा

अकोले : अकोले तालुक्यातील जांभळे येथील दुध संकलन करणारा योगेश चव्हाण हा दुधात तेल व पावडर भेसळ करुन दुध संकलन करत असल्याचे तक्रारीवरून अहमदनगर अन्न व आैषध सुरक्षा विभागाने छापा टाकून १५ गोणी पावडर व तेल ड्रम साठा हस्तगत केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे त्याचे पथक व अकोले प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक हांडोरे बी.बी.यांच्या पथकाने अकोले तालुक्यातील जांभळे येथील शिंदेवाडीतील योगेश चव्हाण हा दुधात भेसळ करत असल्याचे खबरीवरुन चव्हाण याचे घरी आज बुधवार दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वा छापा मारला असता तेथे दुधा भेसळ करण्यासाठीचे १५ गोणी पावडर,तेल ड्रम सह साहित्य मिळून आले तेथील ४० लिटर दुधातून सॅपल घेतले. तर तो चालवत असलेले जांभळे येथील संकलन केंद्रावरही छापा मारून तेथील जवळपास १हजार लिटर दुध नष्ट केले.यावेळी अन्न सुरक्षा अधिकारीनी पंचनामा करुन मुद्देमाल ताब्यात घेऊन सॅपल तपासणीसाठी घेऊन गेले. या सॅपलचा अहवाल आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती अधिकारीनी दिली.

ही कारवाई वेळी अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे,पवार,सुर्यवंशी, साैरभ व पोलिस सपोनी मिथुन घुगे,उपनिरीक्षक बी.बी.हांडोरे,पो.कॅा.बढे,पो.ना.गणेश शिंदे,विठ्ठल शरमाळे, क्षीरसागर,वलवे.पोलिस वाहन चालक मोरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT