अकोले : दुधाला किमान ३५ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी असून, राज्यात नाराजीचा उद्रेक आंदोलनानिमित्ताने पुढे येत आहे.
उत्स्फूर्त दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी रास्तारोको, उपोषणे, निदर्शने सुरू केली आहेत. सरकारने या सर्व आंदोलनांची दखल घ्यावी, दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.
दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारपासून राज्यात अधिक संघटित आंदोलन सुरू होत आहे. किसान सभा व समविचारी विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.
वर्षभर दूध दराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रति लिटर १० ते १५ रुपयांचा तोटा सहन करून दूध उत्पादक शेतकरी दूध घालत आहेत. दूध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे आहे.
राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान ३५ रुपये दर द्यावा, बंद दूध अनुदान पुन्हा सुरू करावे, वाढता उत्पादन खर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर १० रुपये करावे, तसेच अनुदान बंद काळात दूध घातलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, या मागण्या शेतकरी संघर्ष समितीच्या आहेत.
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर विस्तारणार असून, राज्य सरकारने या पार्श्वभूमिवर दूध उत्पादकांचा अधिक अंत पाहू, नये असे आवाहन केले आहे.
डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सतीश देशमुख, अशोक ढगे, जोतीराम जाधव, नंदू रोकडे, दादा गाढवे, राजकुमार झोरी, श्रीकांत कारे, रामनाथ वदक, दीपक वाळे, मंगेश कान्होरे, दीपक पानसरे, सुहास रंधे, अमोल गोर्डे, रवी हासे, दीपक काटे, केशव जंगले आदी उपस्थित होते.
दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा.
उसाप्रमाणे दुधालाही ‘एफआरपी’ व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे.
दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करावी, पशुखाद्य व पशू औषधांचे दर नियंत्रित करावेत.
खासगी व सहकारी दूध संघाना लागू होईल, असा लुटमार विरोधी कायदा करावा.
दूध भेसळ रोखावी, एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा.
तालुकानिहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी.
शासकीय अनुदानातून पशू आरोग्य विमा योजना सुरू करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.