Candidates are gathering for Agni Vir recruitment which is going on for the last two days in the post graduate college premises. esakal
अहिल्यानगर

Agni Veer Recruitment : भरतीसाठी युवकांमध्ये मोठा उत्साह

रहिमान शेख

राहुरी विद्यापीठ (जि. अहमदनगर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जिमखाना परिसरात तसेच पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर गेल्या दोन दिवसांपासून ता. २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत भारतीय संरक्षण दलाच्या पुणे येथील भरती कार्यालयाच्या वतीने 'अग्निवीर भरती मेळावा’ सुरू झाला.

अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांतील अग्निवीर जनरल ड्युटी, तांत्रिक, लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल आणि ट्रेड्समन श्रेणींकरीता ६८ हजार उमेदवारांची नोंदणी झाली आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आली आहेत. (Agni Veer Recruitment at rahuri university Enthusiasm among youth for recruitment ahmednagar latest marathi news)

या भरतीसाठी तरूणांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे, विद्यापीठ परिसरामध्ये छावणीचे स्वरूप दिसून येत आहे. लष्कराच्या वतीने सर्व पात्र उमेदवारांना सॅनिटाइज करण्यात येत आहे, विद्यार्थ्यांच्या दिमतीसाठी चोवीस तास डॉक्टरांचे पथक रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेले आहेत.

उमेदवारांच्या भरती प्रक्रियेसाठी व्यावसायिक पद्धतीने पायाभूत सुविधा आणि एकूण मांडणी केली आहे. उमेदवारांसाठी भोजन, पेयजल आणि विश्रांतीची सोय देखील करण्यात आली आहे. भरती मेळाव्यासाठी दररोज ४००० ते ५००० उमेदवार येत आहेत. यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग, अग्निशमन यंत्रणा तसेच विद्यापीठ प्रशासन या सर्व व्यवस्थेसाठी लष्करास व उमेदवारांना मदत करत आहेत.

प्रवाशांची हाल : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्या तसेच थांबणारी वाहने अवैध प्रवासी वाहतूक यामुळे समस्या निर्माण झालेली आहे. नगर मनमाड रोडची ट्रॅफिक एका बाजूने वळविण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे यासाठी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व पोलीस प्रशासन वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.

अशी आहे प्रक्रिया : रात्री बारा वाजता प्रवेशद्वारावरच सर्व उमेदवारांचे प्रवेशपत्र तपासून उंची मोजली जाते, उंचीच्या निकषांमध्ये पात्र असलेल्या उमेदवारांचीच पुढील चाचणी सुरू होते.

यामध्ये १.६ किमी धावणे, लांब उडी, पुलप्स, उंच उडी, झिग झैक पळणे, शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या, शारीरिक मोजमाप चाचण्या, कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकीय चाचण्यांचा समावेश असेल. दररोज सुमारे ५००० विद्यार्थ्यांपैकी सुमारे शंभर विद्यार्थी निवडले जातात या सर्व निवड झालेल्या उमेदवारांची १६ ऑक्टोबर, २०२२ रोजी लेखी परीक्षा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT