Agriculture  
अहमदनगर

Agriculture : चढ्या दराने बियाणे विक्री भोवली! ६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबीत

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : ठरवून दिलेल्या बाजारभावापेक्षा जास्त दराने बियाणे विक्री करणे कृषी सेवा केंद्राच्या चालकांना चांगलेच भोवले आहे. जिल्हा कृषी अधीक्षकांना याप्रकरणी जिल्‍ह्यातील सहा कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत. त्यामध्ये ४ बियाणे विक्री केंद्र तर २ कीटकनाशके विक्री केंद्रांचा समावेश आहे.

सध्या खरीप हंगाम सुरु झाला आहे. समाधानकारक पाऊस झाला असल्याने बियाणे खरेदीसाठी शेतकरी अद्यापही उत्सुक दिसत नाही. मात्र काही शेतकरी धूळपेर करतात. यासाठी बाजारामध्ये बि-बियाणे, खते व इतर कृषि साहित्य खरेदी करत आहेत.

यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होणेचे दृष्टीने कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे. जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना केली आहे. प्रत्येक तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत आहे.

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी एकुण १५ भरारी पथके जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जात आहे.

शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्या विक्री केंद्रांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. जिल्हाभर भरारी पथक कार्यरत आहे. निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या ४ बियाणे विक्री केंद्रांचे व २ किटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आली आहेत.

निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्ह्यामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये. शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या दरातच विक्री करावा. अन्यथा त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

- सुधाकर बोराळे, जिल्हा कृषी अधीक्षक

कारवाई झालेल्या कृषी सेवा केंद्रांची नावे.

नेवासा तालुका

१) संजीवन कृषी सेवा केंद्र, करजगाव.

२) सद्गुरू कृषी सेवा केंद्र सोनई.

३)जगदंबा कृषी सेवा केंद्र, घोडेगाव.

४)बळीराजा ऍग्रो सर्व्हिसेस कौटा.

राहुरी तालुका

१)किसान कृषी सेवा केंद्र वळण ,

नगर तालुका

१) अक्षमला सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, अहमदनगर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT