Ahemadnagar Fire Team eSakal
अहिल्यानगर

अहमदनगर : १५ मिनिटे, अग्नितांडव आणि ११ बळी, वाचा नेमकं काय घडलं?

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वार्डात आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली.

गोरक्षनाथ बांदल

Ahemadnagar Fire: अहमदनगरमध्ये आजची सकाळ ही एका धक्कादायक घटनेनं झाली. जिल्हा रुग्णालयात आज सकाळी साडे दहाच्या सुमारास आग लागली. रुगणालयाच्या कोविड वॉर्डमधील आयसीयु विभागात लागलेल्या या आगीनं क्षणार्धात भीषण रुप धारण केलं आणि पाहता पाहता ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणात अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना शहरातील इतर रुग्णालयांत हालवण्याल आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये आयसीयु विभागात १०:३० वाजता आग लागली होती. त्यानंतर पुढच्या काही मिनीटांत या आगीवर नियंत्रण देखील मिळवलं. मात्र फक्त १५ मिनिटांमध्ये म्हणजे १०:४५ला ही आग विझेपर्यंत थेट ११ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेतील अनेकजण गंभीर जखमी असल्याने मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटना घडली त्यावेळी २५ रुग्णांची क्षमता असलेल्या या वॉर्डमध्ये १७ रुग्ण उपचार घेत होते. यावेळी दरवाजाजवळ असलेल्या काही रुग्णांना बाहेर काढण्यात रुग्णालय प्रशासन आणि अग्णिशमण दलाच्या जवानांना यश आलं. तर दरवाजापासून दुर असलेल्या रुग्णांना मात्र बाहेर काढता आलं नाही.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार आगीचं स्वरुप भीषण होतं. रुग्णालयातील वायरींगमुळे आग वेगानं पसरली. या आगीमुळे रुग्णालयाच्या काचा फुटल्या. रुग्णांना बाहेर पडण्यासाठी केवळ एकच मार्ग उपलब्ध असल्यानं गोंधळ उडाला. महाराष्ट्रात कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्यानं पाहिलं जात असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT