Ahmedgarh NGOs protested the government 
अहिल्यानगर

VIDEO : सरकारने दारूला परवानगी दिली म्हणून यांनीही वाटला चकना

सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगर शहरात आज दुपारी मद्य दुकानांसमोर मद्यपि मद्य खरेदी करत होते. यावेळी अचानक दोन-तीन जण चकणा घेऊन प्रकटले. "चकना लो चकना' असे म्हणत हातात चकना पुड्या घेऊन गेले. कोणी का असेना असे म्हणत मद्यपींनीही बैठक मारली. एक पेग घशात रिचवला मग एकामागून एक गेले. 
चकन्याच्या पिशव्या पाहिल्या. त्यावर लिहिले होते "मोफत कोरोना स्पेशल चकना (जीवनावश्‍यक दारूसाठी) राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पोषक आहार! जागरूक नागरीक मंचतर्फे' हे वाचून मद्यपींची चांगलीच झिंग उतरली.

जनता लॉकडाउनमुळे घरात बसून काटेकोरपणे सर्व नियामांचे पालन करत आहे. अशा परिस्थितीत केवळ महसूलाचे कारण देत सरकारने सर्व दारूची दुकाने चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा जागरूक नागरिक मंचतर्फे मद्यपींना चकना वाटत अनोखा निषेध व्यक्‍त करण्यात आला. या निषेध आंदोलनाची आज शहरभर चर्चा होती. 

जागरूक नागरिक मंचेचे अध्यक्ष सुहास मुळे म्हणाले, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गोरगरीब जनतेला जीवनावश्‍यक वस्तू देण्यासाठी हजारो नागरिक मदत करत आहेत. दारू जर जीवनावश्‍यक वस्तू आहे तर दारू घेणाऱ्यांसाठी चकनाही महत्वाचा आहे. म्हणून जागरूक नागरिक मंचतर्फे राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पोषक आहार म्हणून कोरोना स्पेशल चकन्याचीे पाकिटे वाटली आहेत. 

दारू घेण्यासाठी रांगेत उभे असलेल्या नागरिकांना ही पाकिटे देऊन निषेध आंदोलन केले. जोपर्यंत राज्य सरकार हा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू असणार आहे. दुर्दैवाने सरकारमध्ये काही तंबाखू छाप व काही मोसंबी छाप बसलेले असल्यामुळे त्यांनी या समदु:खी मंडळीचे दु:ख दारू खुली करून हलके केले असावे. 

या आंदोलनाला आमदार संग्राम जगताप यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. जागरूक नागरिक मंचचे कैलास दळवी, भैरवनाथ खंडागळे, योगेश गणगले, हरिभाऊ डोळसे, सुनील कुलकर्णी, राजू पडोळे, बी.यू. कुलकर्णी, अमेय मुळे आदी सहभागी झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT