अहिल्यानगर

Dogs Sterilization:श्वानाच्या निर्बीजीकरणाचे 'कागदोपत्री घोडे'! एका श्वानावर ९५० रुपयांचा खर्च, देखरेख समिती अद्याप कागदावरच

श्‍वानांचे निर्बीजीकरण करण्याच्या नावावर महापालिकेत दरमहा लाखो रूपयांची उधळपट्टी सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar Dogs Sterilization: श्‍वानांचे निर्बीजीकरण करण्याच्या नावावर महापालिकेत दरमहा लाखो रूपयांची उधळपट्टी सुरू आहे. ‘पिपल्स फॉर ॲनिमल’ ही संस्था महापालिकेकडून एका श्‍वानांच्या निर्बीजीकरणासाठी ९५० रूपये उकळत आहे. विशेष म्हणजे या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमण्यात आलेली उपायुक्तांची समितीही अद्याप कागदावरच आहे.

शहरातील श्‍वानांची पैदास रोखण्यासाठी पिपल्स फॉर ॲनिमल या ठेकेदार संस्थेला श्वान निर्बिजीकरणाचा ठेका देण्यात आला आहे. सध्या कोटेशन पध्दतीने तीन महिन्यांसाठी हे काम देण्यात आले आहे. यापूर्वी संबंधित संस्थेने दोन वर्ष हे काम केले. या कालावधीत शहरातील साडेपाच हजार श्‍वानांचे निर्बिजीकरण केले असल्याचा दावा या संस्थेने केला आहे.

या संस्थेला पुन्हा हे काम देवू नये, अशी मागणी शिवसेनेचे विक्रम राठोड यांनी केली होती. एका पक्षाचा पदाधिकारी या संस्थेत ‘शॅडो’ पार्टनर असल्याचा आरोप देखील राठोड यांनी केला होता. असे असतानाही याच संस्थेला पुन्हा निर्बिजीकरणाचा ठेका देण्यात आला. एका श्‍वानाचे निर्बिजीकरण करण्यासाठी संबंधित संस्थेला ९५० रूपये दिले जातात. त्याप्रमाणे सध्या दररोज दहा ते बारा श्‍वानांचे निर्बिजीकरण होत असल्याचा दावा महापालिका करत आहे. असे असले तरी शहरातील मोकाट श्‍वानांची दहशत कमी झालेली नाही.

कामात मनमानी

श्वान निर्बिजीकरणावर देखरेख ठेवण्यासाठी उपायुक्त, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी, आरोग्याधिकारी आणि सहायक उपायुक्तांची स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ही समिती अद्याप कागदावरच आहे. त्यामुळे निर्बिजीकरणाच्या कामात मनमानी सुरू आहे. त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. (Latest Marathi News)

लाखो रुपये उकळल्याचा शिवसेनेचा आरोप

शहरातील सुमारे साडेपाच हजार श्‍वानांचे निर्बिजीकरण झाले असल्याचा ‘पिपल्स फॉर ॲनिमल’ या संस्थेचा दावा आहे. एका श्‍वानासाठी ९५० रुपये याप्रमाणे बिल देण्यात आले आहे. मात्र, या संस्थेने कागदोपत्री बिले तयार करून महापालिकेकडून लाखो रूपये उकळले असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT