Ahmednagar Chain Snatching Crime: तुम्ही रस्त्याने जात असताना अचानक कुणीतरी येतं आणि तुम्हाला एखादा पत्ता विचारतं. कुणी पत्ता विचारल्यास महिला सहजपणे त्या व्यक्तीशी संभाषण करतात. पण, कुणी तुम्हाला पत्ता विचारत असेल, तर आधी सावध होणे गरजेचे आहे. कारण सोनसाखळी चोरट्यांची गुन्हे करण्याची पद्धत अशीच आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून लुटण्याच्या घटनांमध्ये नगरमध्ये वाढ झाली आहे. हीच पद्धत वापरून गेल्या दोन वर्षांत तब्बल १८५ गुन्हे घडले आहेत.
शहरी भागासह ग्रामीण भागात सोनसाखळी चोरांचा वावर वाढला आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या चोरांचा नगरमध्ये सुळसुळाट झाला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांकडून वृद्ध महिलांना 'टार्गेट' केले जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
गत दोन वर्षांत सोनसाखळी चोरीच्या १८५ घटना घडल्या असून, सर्वाधिक गुन्हे कोतवाली, तोफखाना, श्रीरामपूर व शिर्डी पोलिस ठाण्याच्या हदीत घडले आहेत. सराईत सोनसाखळी चोरटे गुन्हे करून पोलिसांना हुलकावणी देत असून, शहरासह उपगनरे चोरट्यांच्या दहशतीखाली असल्याचे चित्र आहे. सोनसाखळी चोर प्रामुख्याने वृद्ध महिलांना लक्ष्य करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे महिलांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
१ डिसेंबरची घटना
बालिकाश्रम रस्त्याने ६७ वर्षीय महिला शुक्रवारी (ता. १) जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडून नेले. दागिने ओरखडल्यानंतर महिलेला जोराचा धक्का देऊन चोरट्यांनी दुचाकीवरून पोबारा केला. ओळख पटू नये म्हणून दोघांनीही डोक्यात हेल्मेट घातले होते. तोफखाना पोलिस ठाण्यात शारदा रघुनाथ गाजुल (वय ६७, रा. बालिकाश्रम रोड, नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)
ही घ्या खबरदारी
अनोळखी व्यक्तीशी बोलणे टाळा
अंगावरील दागिने काढू नका
वृद्ध महिलांनी एकटे
फिरताना दागिने घालू नये
निर्जनस्थळी जाताना सावध राहा
पत्ता विचारणाऱ्यांशी लांबून बोला.
'एलसीबी'ने केली २५ गुन्ह्यांची उकल
चेन स्नॅचिंगचे गुन्हे पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. बहुतांश वेळा आरोपी हे बाहेरील असल्याने पोलिसांसमोर त्यांना अटक करण्याचे आव्हान असते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांत २५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही समावेश आहे. एलसीबीच्या पथकाने श्रीरामपुरातील पटेकर, पिंपळे गंग, कोपरगावमधील चोभे गंग, श्रीरामपुरातील जाधव गंगला बेड्या ठोकल्या आहेत, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज येथील एका टोळीला काही महिन्यांपूर्वी एलसीबीने अटक केली होती. Latest Marathi News | Breaking Marathi News | Live News in Marathi | Sakal (esakal.com)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.