Confusion over school decision number of coronaviruses increases  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : शाळांच्या निर्णयामुळे संभ्रम; कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

नऊ लाख पालकांचा जीव टांगणीला

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शाळा सुरु कराव्यात, अशी मागणी खासगी शाळांसह काही शिक्षक संघटनांसह ठराविक पालक वर्गातून झालेली आहे. वाढती मागणी लक्षात घेता राज्य सरकारने शाळा सोमवार (ता.२४) पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्याची कोरोनाची आकडेवारी पहाता पालकांमध्ये मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, असा संभ्रम निर्माण झाले आहे.(Ahmednagar coronaviruses increases)

जिल्ह्यातील नऊ लाख पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्याबरोबरच राज्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली कडक करण्यास सुरवात केलेली आहे. खासगी कार्यलयांमध्ये उपस्थिती ५० टक्के करण्याचा आदेश जारी केलेला आहे. तसेच सर्व सरकारी कार्यालयातील बायोमॅट्रीक हजेरी तूर्त बंद करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. त्यामुळे राज्य सरकारने आता पूर्वी १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा घेतला निर्णय स्थगित करत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील पालक संभ्रामावस्थेत असून मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, असा प्रश्‍न त्यांच्या पुढे उभा राहिलेला आहे.

हमी पत्र भरून घेऊ नका

राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांकडून संमतीपत्रक भरून घेणे आता बंद करणे गरजेचे आहे. शासन जर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेत आहे. तर पालकांकडून संमतीपत्र कशासाठी भरू घेता, असा सवाल पालकांमधून केला जात आहे.

दृष्टिक्षेपात..

  • जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या शाळा ४३०१

  • एकूण विद्यार्थी : २८८९९२

  • जिह्यातील पाचवी ते बारावीच्या शाळा : २०२६

  • एकूण विद्यार्थी : ६०२५१३

''कोरोनामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान खूप झालेले आहे. पण आताची परिस्थिती पहाता योग्य तातडीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे चुकीचे ठरले. दहा ते पंधरा दिवसानंतर परिस्थिती पाहून शाळा सुरु करणे उचित ठरेल.''

- कल्पना गांधी, माजी अध्यक्ष, इनरव्हील क्लब, अहमदनगर.

''विद्यार्थ्यांचै शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा भरविणे आवश्‍यक आहे. परंतु सध्याची कोरोनाची आकडेवारी पहाता शाळा सुरु करणे धोकादायक ठरू शकते. तूर्ततरी शाळा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने पुढे ढकलावा.''

- चंद्रकांत जाधव, पालक तथा सामाजिक कार्यकर्ता

''कोरोनाची आकडेवारी कमी जास्त होत राहणार आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होऊ लागलेला आहे. त्यामुळे शाळा बंद न ठेवता आता सुरु ठेवाव्यात. यासाठी पालकांनीही मुलांच्या भविष्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे.''

- अय्याज देशमुख, पालक तथा उपसरपंच, भानसहिवरे, ता. नेवासे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT