cotton esakal
अहिल्यानगर

Ahmednagar : कापसाला भाववाढ नाही

विक्रीअभावी कापूस घरातच; भाव मिळण्याची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

भेंडे : जून-जुलैमध्ये समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीपातील तूर, मका, सोयाबीन, बाजरीबरोबर कापूस हे नगदी घेतले. कपाशी जोमात वाढली, परंतु परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला अन् दिवाळी सणाच्या काळात वेचणीस आलेला कापूस खराब झाला. इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले.

पाऊस उघडल्यावर १० ते १२ रुपये प्रति किलोप्रमाणे खर्च करत वेचणी केली. भाव वाढ होईल या आशेने कापूस साठवून ठेवला. पण जानेवारी संपत आला तरी अजूनही अपेक्षित भाववाढ न झाली नाही.

बराचसा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. मागील वर्षी गुणवत्तेनुसार १० ते १२ हजार रुपयांपर्यंतचे भाव देणारा कापूस यंदा मात्र नऊ हजारापर्यंतच पोहोचला आहे. त्यामुळे यंदा अपेक्षित भाववाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी गरजेपुरता कापूस विकला.

दरवर्षी दसरा-दिवाळी सणापासून सुरू झालेली कापूस विक्री जानेवारीपर्यत मोठी आर्थिक उलाढाल करून जातो.

यंदा परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. एकरी उत्पन्नात मोठी घट झाली. १० ते १२ किलोने वेचणी करत शेतातील कापूस वेचणी केली. गजरेपोटी काही कापूस विकला आहे तरी अपेक्षित भाव मिळेल या आशेने काही कापूस ठेवला आहे. शेतीमालाचा वाढता उत्पादन खर्च व मिळणारा भाव यामुळे आर्थिक ताळमेळ घालणे अवघड होत चालले आहे.

- राजेंद्र मिसाळ, शेतकरी, भेंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT