tiktok Facebook and WhatsApp are the most downloaded apps YouTube is top on video streaming app 
अहिल्यानगर

Ahmednagar Crime : फेसबुकवरील मैत्री भोवली,३० लाखांला गंडा; ती विधवा असल्याची समजता जवळीक वाढवली

कोविड काळात फेसबुकवर पीडित महिलेशी ओळख झाली होती. फेसबुकवर झालेल्या संभाषणातून ती विधवा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने या महिलेशी वेळोवेळी फोनवरून संपर्क साधत जवळीक वाढवली.

सकाळ डिजिटल टीम

संगमनेर - शहरातील एका ३८ वर्षीय विधवा महिलेशी फेसबुकवर झालेल्या मैत्रीचा फायदा घेत, तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याकडून वेळोवेळी सुमारे ३० लाख रुपये घेऊन, ते परत देण्यास नकार देत, तिच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पीडितेने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून योगेश सुभाष टोपेकर (रा. आळंदी, पुणे) याच्याविरुद्ध अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश टोपेकर याची कोविड काळात फेसबुकवर पीडित महिलेशी ओळख झाली होती. फेसबुकवर झालेल्या संभाषणातून ती विधवा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने या महिलेशी वेळोवेळी फोनवरून संपर्क साधत जवळीक वाढवली. या ओळखीतूनच त्याचे या महिलेच्या घरी येणे-जाणे सुरू झाले.

तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवीत विश्वास संपादन करून त्याने तिच्या इच्छेविरुद्ध संगमनेर येथील तिच्या राहत्या घरी आणि शिर्डीतील हॉटेलमध्ये वारंवार अत्याचार केला. सप्टेंबर २०२० ते १ मे २०२३ या काळात हा प्रकार घडला असून, यादरम्यान त्याने तिच्याकडून फोन पे, गुगल पे या ऑनलाइन प्रणालीद्वारे सुमारे ३० लाख ३७ हजार रुपये घेतले. पीडितेने त्याच्याकडे पैशांची मागणी केली तेव्हा त्याने, मी तुझ्यासोबत लग्न करतो, पैशांबद्दल बोलू नकोस, नाही तर तुझ्या मुलीस मारून टाकीन, अशी धमकी पीडित महिलेला दिली.

पैसे परत मिळावेत, यासाठी पीडित महिलेने वारंवार योगेश टोपेकर याच्याशी संपर्क साधला असता त्याने मोबाईल बंद करून टाकला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तिने आपली आर्थिक फसवणूक केल्याचा, तसेच आपल्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी एकटेपणाचा फायदा घेऊन अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत तिने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT