ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : रस्ता ओलांडताना भाविकांची दमछाक ; शिर्डीत अहमदनगर-कोपरगाव महामार्गावर स्कायवॉक उभारण्याची गरज

तरीही येथे अद्यापही स्कायवॉक किंवा भुयारी मार्ग करण्याचा विचार राष्ट्रीय महामार्गाचा आराखडा तयार करताना झालेला नाही.

सतीश वैजापूरकर

शिर्डी - सिन्नर ते सावळीविहार या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या लोकसंख्येच्या प्रत्येक गावाजवळ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉक उभारण्यात आले. नगर ते कोपरगाव रस्त्यावर मोठ्या लोकसंख्येच्या प्रत्येक गावात त्याची गरज असताना एकही स्कायवॉक नाही. स्कायवॉक अभावी शिर्डीत रस्ता ओलांडताना भाविकांचे हाल आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. सावळीविहीर, पिंपरी निर्मळ, बाभळेश्वर, कोल्हार आणि राहुरी येथेही अशीच परिस्थिती आहे. त्यातून बऱ्याचदा अपघात देखील होत आहेत.

साई संस्थानचे प्रसादालय पश्चिमेला आहे आणि साई मंदिर पूर्वेला आहे. मधोमध नगर-सावळीविहीर राष्ट्रीय महामार्ग आहे. दररोज सरासरी चाळीस हजार भाविक साईदर्शनानंतर हा रस्ता ओलांडून प्रसादालयाकडे जातात. या रस्त्यावरून वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणावर सुरू असते. वेगाने जाणाऱ्या वाहनांचा अंदाज घेऊन भाविकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. शेपन्नास भाविक रस्ता ओलांडू लागले की वाहतुकीचा खोळंबा होतो. दिवसभर हा खेळ सुरू असतो.

तरीही येथे अद्यापही स्कायवॉक किंवा भुयारी मार्ग करण्याचा विचार राष्ट्रीय महामार्गाचा आराखडा तयार करताना झालेला नाही. सरकत्या जिन्यांची सुविधा असलेले किमान तीन स्कायवॉक शिर्डीत उभारणे गरजेचे आहे.

राहाता हे तालुक्याचे गाव. गुरुवारी बाजारच्या दिवशी पंधरा ते वीस हजार लोक हा रस्ता बाजार करण्यासाठी ओलांडतात. वाहतुकीचा खोळंबा आणि अपघात देखील होतात. येथेही किमान सरकत्या जिन्यांचे दोन स्कायवॉक उभारणे गरजेचे आहे. बाभळेश्वर, कोल्हार व राहुरी येथेही भुयारी मार्ग किंवा स्कायवॉकचीआवश्यकता आहे.

स्कायवॉकचा विचारच नाही

नगर-सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या वीस वर्षांपासून रखडले. ठेकेदार आणि रस्ते बांधणीचा खर्च बदलत राहिला. मात्र हा रस्ता बांधताना एकदाही स्कायवॉक उभारणीचा विचार झाला नाही. भाविकांसाठी धर्मशाळा उभारावी, असे मायबाप सरकारला वाटले नाही. याउलट सिन्नर ते सावळीविहीर या राष्ट्रीय महामार्गावर गरज आहे तेथे स्कायवॉक उभारले, साईभक्तांसाठी सुसज्ज धर्मशाळा उभारली आणि दुतर्फा झाडे देखील लावली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT