Ahmednagar Cyber 1 Crore Fraud: गेल्या २२ महिन्यांत सायबर चोरट्यांनी ‘ओटीपी’ व ‘पासवर्ड’च्या आधारे नागरिकांच्या बॅंक खात्यातून एक कोटी रुपये लंपास केले आहेत. फसवणुकीतील रक्कम परत मिळविण्यासाठी सायबर पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
दिवसेंदिवस काळ ‘हायटेक’ होत चालला आहे. प्रत्येक व्यक्तीकडे आज मोबाईल आहे. मोबाईलमधूनच सर्व व्यवहार हाताळले जातात. ओटीपी व पासवर्डला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे, तर हाच ओटीपी व पासवर्ड दुसऱ्यांना दिल्यास सायबर क्राईमचा धोका वाढत आहे. फसवणूक टाळायची असेल, तर नागरिकांनी सायबर चोरट्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
कारण, बॅंकेचा ओटीपी सांगितल्याने अनेकांवर डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली आहे. ओटीपी विचारण्यासाठी सायबर चोरांकडून नवनवीन शक्कल लढविल्या जातात. तुम्हाला लॉटरी लागली आहे, क्रेडिट कार्डवर लोन मंजूर झाले आहे. बॅंकेची केवायसी पूर्ण नाही, वीजबिल थकले आहे, अशा प्रकारची कारणे सांगून ओटीपी व पासवर्ड विचारण्याची चोरट्यांची पद्धत आहे.
गेल्या २२ महिन्यांत ‘बॅंकिंग फ्रॉड’ चे १०७ गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल झाले. बॅंक खात्यातून सुमारे एक कोटीच्या रकमेवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. सायबर पोलिसांकडून चोरीला गेलेली रक्कम मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आरोपी मोबाईल नंबर आणि लोकेशन बदलत असल्याने पोलिसांना तपासात आव्हानांचा सामना करावा लागतो.
हजारो सिम कार्डचा वापर
बॅंकिंग फ्रॉड करण्यासाठी सायबर चोरट्यांकडे हजारो सिम कार्ड असतात. स्कॅम करण्यासाठी बल्कमध्ये सिम कार्डची खरेदी केली जाते. एखाद्याची फसवणूक केल्यानंतर ते सिम कार्ड फेकून दिले जाते व लोकेशनही चोरटे बदलत असतात. त्यामुळे फसणूक झाल्यास गुन्हेगार पोलिसांच्या लवकर हाती लागत नाहीत. (Latest Marathi News)
१९३० वर तत्काळ करा संपर्क
फसवणूक झाल्यास सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा. पोलिसांना माहिती दिल्यास फसवणुकीची रक्कम फ्रीज करण्यासाठी प्रयत्न केले जातात. एखाद्यावेळी कॉल न लागल्यास सायबर पोलिस ठाण्यात जाऊन तत्काळ तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.