अहमदनगर : एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरु करून पावणे तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. याचा एसटीला सर्वाधिक फटका बसलेला आहे. आता प्रशासनाने कडक कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी कामावर येऊ लागलेले आहेत. जिल्ह्यात १३३ बसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा पुरवली जात आहे.(Ahmednagar district ST bus service)
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यांनी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळून आता कामावर हजर होणे गरजेचे असतानाही संप सुरु ठेवला आहे. त्यामुळे प्रवासीही वैतागले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्या तरी सर्वसामान्यांची होणारी गैरसोय पाहून कर्मचाऱ्यांनी दोन पावले मागे घेऊन पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसने गरजेचे होते, असे मत प्रवाशांमधून व्यक्त केले जात आहे.
पावणे तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आजअखेरपर्यंत एसटीचे १२६९ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सध्या जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही बसस्थानकांमध्ये खासगी वाहने प्रवासी घेत आहेत. त्याचा फटाका आगामी काळात एसटीला बसणार आहे. जिल्ह्यात एकूण १२६९ कर्मचारी विविध आगारांमध्ये कामावर हजर झाले. यामध्ये प्रशासकीय ३४७, कार्यशाळेचे ४१९, चालक २१२, वाहक २८४ व चालक तथा वाहक नऊ कामावर हजर झालेले आहेत. सध्या १३० बसच्यामाध्यमातून जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यात २६६ फेऱ्या केल्या जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.