Balasaheb Thorat and Devendra Fadnavis Sakal
अहिल्यानगर

Congress Party: अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस डेंजर झोनमध्ये

थोरात साहेबांचं कॉँग्रेसमध्ये असं होत असंल, तर या पक्षाचं काय खरंय, अशा प्रतिक्रिया सामान्य माणसांकडून सध्या कानावर पडत आहेत. जो पक्ष देशाबरोबर राज्यातही बिकट स्थितीतून जात आहे.

प्रकाश पाटील patilisprakash@gmail.com

Ahmednagar News: थोरात साहेबांचं कॉँग्रेसमध्ये असं होत असंल, तर या पक्षाचं काय खरंय, अशा प्रतिक्रिया सामान्य माणसांकडून सध्या कानावर पडत आहेत. जो पक्ष देशाबरोबर राज्यातही बिकट स्थितीतून जात आहे, तो जिल्ह्यात भाजपचा कसा सामना करणार, अन्‌ कसा नंबर वन होणार? सध्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्या पाहता, जिल्ह्यात कॉँग्रेस डेंजर झोनमध्ये आहे, असे म्हणावे लागेल.

ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, त्यांचे भाचे सत्यजित तांबे आणि कॉँग्रेस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात कॉँग्रेसमध्ये जे काही चालले आहे, ते ठीक नाही. उद्या काय होणार, हे आज सांगता येत नाही.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली आणि राजकारण सुरू झालं. या मतदारसंघाचे गेल्या पंधरा वर्षांपासून नेतृत्व करीत असलेले डॉ. सुधीर तांबे यांना या वेळी निवडणूक लढवायची नव्हती. पुत्र सत्यजित यांना उमेदवारी द्यावी, असे त्यांचे मत होते.

तसे काही घडले नाही. जे रामायण घडायचे होते ते घडून गेले. कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडून न येता सत्यजित अपक्ष लढले आणि निवडूनही आले. असो.

तर मुळ मुद्दा असा आहे, की बाळासाहेबांसारखा कॉँग्रेसचा निष्ठावंत नेता का दुखावला जातो? आपणास भाजपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ते विधानसभेत सर्वांत ज्येष्ठ आमदार आहेत. सातत्याने निवडून येत आहेत.

कॉँग्रेस सोडण्याचे स्वप्नही त्यांनी कधी पाहिले नाही. मात्र, ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत.

लढवय्या संयमी नेता

२०१४ मध्ये राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींचा उदय झाला आणि कॉँग्रेसला धक्क्यावर धक्के बसू लागले. भाजपने अनेक राज्यांत कॉँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. महाराष्ट्रातही तेच झाले. एके काळी कॉँग्रेसचा बालेकिल्ला समजले जाणारे हे राज्यही गेले.

कॉँग्रेस संकटात असताना थोरातांनी कधीही पक्षाशी गद्दारी केली नाही. प्रदेशाध्यक्ष असताना कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आधार बनले. त्यांनी ठरवलं असतं, तर तेही भाजपमध्ये जाऊ शकले असते.

मोठं पदही मिळालं असतं; मात्र ते शांतपणे लढत राहिले. त्यांनी आजपर्यंत कॉँग्रेसमध्ये विविध पदे भूषविली. एखादा नेता जेव्हा पक्ष सोडतो, तेव्हा पक्षाचे किती नुकसान होते, हे (ते उद्धव ठाकरेंनाही विचारा) सांगण्याची गरज नाही.

बाळासाहेब हे नाव महाराष्ट्राला चांगले ठाऊक आहे. ते केवळ जिल्ह्याचे नेते नाहीत. राज्याचे लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याची पक्षात जर घुसमट होत असेल, तर कॉँग्रेससाठी हे नक्कीच फायद्याचे नाही.

भाजपचं मिशन

अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला, तर सर्वाधिक ताकद राष्ट्रवादी कॉँग्रेसची. या पक्षाचे सहा आमदार आहे. त्यानंतर भाजपचे तीन, कॉँग्रेसचे दोन आणि एक अपक्ष.

कॉँग्रेसमध्ये थोरातच नाराज असतील, तर कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहायचे? जिल्ह्यात कॉँग्रेस कसे बाळसे धरणार? एक वर्षावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत.

सामान्य कार्यकर्ते पक्षाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार? थोरात यांच्यानंतर जिल्ह्यात कॉँग्रेसला नवसंजीवनी देईल असा एकही चेहरा समोर दिसत नाही.

कॉँग्रेसमध्ये जे काही चालले आहे, त्याचा फटका कॉँग्रेसला बसला तर नवल वाटू नये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. दोन्ही कॉँग्रेसला कसे खिळखिळे करता येईल हे ते पाहतील.

त्याची झलक नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून आली. कॉँग्रेसमध्ये काय चालले आहे, याचा अचूक वेध घेऊन खेळी केली.

आज काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून पक्ष उभारण्याचे सोडून भांडत बसले आहेत. मतभेद विसरून एकदिलाने पक्षासाठी कार्य केले. तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली, तर निश्‍चितपणे चित्र बदललेले दिसेल. तसे झाले नाही, तर काही खरे नाही. देशात कितीही मोठी लाट आली, तरी संगमनेरमधील काँग्रेसच्‍या बालेकिल्ल्याला कधी तडा गेला नाही.

थोरात आणि संगमनेर हे नातं वर्षानुवर्षांचं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांचे या जिल्ह्याकडे बारीक लक्ष असेल, तर दोन्ही कॉँग्रेसने तशी पावले टाकायला हवीत की नको? जिल्ह्यातून सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचं भाजपचं मिशन असेल, तर दोन्ही कॉँग्रेसला गप्प बसून चालेल का? जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतसे वातावरण तापत जाणार आहे.

पुढे कोण कुठे असेल, हे काही सांगता येत नाही. आज जे ज्या पक्षात आहेत, ते त्या पक्षात असतीलच हे काही सांगता येणार नाही. आज जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला, तर कॉँग्रेस डेंजर झोनमध्ये आहे, हे मात्र नक्की!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT