Ahmednagar - एटीएम कार्डद्वारे कॅश डिपॉझिट मशिनमध्ये पाचशे रुपयांच्या बनावट १६ नोटांचा भरणा करून आयसीआयसीआय बँकेची आठ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या स्टेशन रस्त्यावरील शाखेचे उपव्यवस्थापक महादेव वसिष्ठ नायकोडे (वय ३२, रा. सारसनगर, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोहन जीवाराम लाल (पत्ता माहिती नाही) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सीएमएस इन्फो सिस्टम एजन्सी, सारसनगर ही एजन्सी प्रत्येक दिवशी कॅश डिपॉझिट मशिनमधून जमा झालेली रक्कम आयसीआयसीआय बँकेत जमा करीत असते. नायकोडे, बँक व्यवस्थापक राजीव गोल्हार, रोखपाल वैष्णवी फुलारे यांच्या समक्ष १८ जुलै रोजी सकाळी सीएमएस इन्फो सिस्टम एजन्सी यांच्या प्रतिनिधींनी नेहमीप्रमाणे कॅश डिपॉझिट मशिन उघडले.
त्यावेळी पाचशे रुपयांच्या चलनी बनावट १६ नोटा आढळून आल्या. दरम्यान, कॅश डिपॉझिट मशिनमधील ट्रॅन्झॅक्शनची तपासणी केली. त्यावेळी मोहन जीवाराम लाल याच्या मोबाईल व बँक खात्यावरून एटीएम कार्डद्वारे कॅश डिपॉझिट मशिनमध्ये बनावट नोटांचा भरणा झालेला होता.
आयसीआयसीआय बँकेने करन्सी चेस्ट पुणे यांनी बँकेला कळविले आहे. यानंतर गुरुवारी (३१ ऑगस्ट) पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.(Latest Marathi News)
बनावट नोटांसाठी मशिनमध्ये वेगळा ट्रे
कॅश डिपॉझिट मशिनमध्ये मळलेल्या, फाटलेल्या, तसेच बनावट नोटांसाठी वेगळे ट्रे असतात. फाटलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा मशिन नाकारू शकते, तथापि, बनावट नोटा वेगळ्या ट्रेमध्ये टाकल्या जातात. त्यामुळे त्या पुन्हा ग्राहकाकडे न गेल्याने बाजारात जात नाहीत.
बनावट नोटा असल्यास संबंधित बँक खातेदाराकडे चौकशी होते व गुन्हा दाखल करण्याची तरतूद असते. तसेच कॅशिअरकडे कोणी बनावट नोट जमा करण्याचा प्रयत्न केला, तर ती जप्त करून संबंधित ग्राहकांवर कारवाई करण्यात येते, असे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले.
बनावट नोटांबद्दल माहिती असताना, त्या नोटा चलनात आणणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. भारतीय दंड संहितेमधील कलम ४८९ (सी) नुसार सात वर्षे सक्तमजुरी शिक्षेची तरतूद आहे.
-ॲड. अभय ओस्तवाल, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ
एटीएम मशिनच्या साहाय्याने बनावट नोटा चलनात आणल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याने बँक अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास सुरू आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.
-चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कोतवाली पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.