Money Fraud esakal
अहिल्यानगर

ॲक्टिंगचा नाद! गेले तेवीस लाख,चित्रपटात काम देण्याचे आमिष; कॅमेरामनला बेड्या

मुलीला चित्रपटात अभिनयाची संधी देण्याच्या आमिषाने वडील शिक्षकांकडून तब्बल २३ लाख रुपये उकळल्याचा प्रकार नगरमध्ये समोर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar Fraud Case:अहमदनगरमधून फसवणुकीची घटना समोर आली आहे. मुलीला चित्रपटात अभिनयाची संधी देण्याच्या आमिषाने वडील शिक्षकांकडून तब्बल २३ लाख रुपये उकळल्याचा प्रकार नगरमध्ये समोर आला आहे. कोतवाली पोलिसांनी हा बनाव उघड करून दोन आरेापींना बेड्या ठोकल्या आहेत. राजेश भगवान पवार व अमित अरविंद देशमुख (दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

राजेश पवार हा कॅमेरामॅन म्हणून छोट्या-मोठ्या चित्रपटांमध्ये काम करायचा. त्याची २०१६ मध्ये शिरीषकुमार कदम (वय ५० रा. निर्मलनगर, सावेडी) यांच्याशी ओळख झाली. कदम हे एका विद्यालयात शिक्षक आहेत.

तुमच्या मुलीला चित्रपटात काम देतो, असे आमिष पवार यांनी कदम यांना दाखविले. सुरुवातीला तीन लाखांची मागणी केली. मुलीला सिनेसृष्टीत जाण्याची इच्छा असल्याने कदम यांनी याला पैसे पाठविले. त्यानंतर चित्रपटाच्या शुटिंगसाठी ओतूर (जि. पुणे) येथे बोलावून घेतले. काही दिवस शुटिंग केल्यानंतर पवार याने कदम यांच्याकडे कागदपत्रांच्या नावाखाली पैशांची मागणी केली.

कदम यांनी तब्बल तेवीस लाख रुपये पवारच्या खात्यावर जमा केले. मात्र, कोणत्याही चित्रपटात त्यांची मुलगी झळकली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कदम यांनी पैसे परत मागितले. कदम यांनी हा प्रकार पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या कानावर घातल्याने आरोपींना अटक झाली.(Latest Marathi News)

असा झाला बनाव उघड

कदम यांना २३ लाख रुपयांच्या मोबदल्यात आलिशान कार देतो, असे पवारने सांगितले. कदम यांना नगरच्या आरटीओ कार्यालयासमोर बोलावून घेतले. मात्र शंका आल्याने त्यांनी हा प्रकार पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना फोनवरुन सांगितला. निरीक्षक यादव यांनी आपल्या पथकासह सापळा लावला. कार देण्याच्या नावाखाली बोगस कागदपत्रांवर सह्या घेताना तोतया आरटीओ अधिकारी देशमुख व पवार यांना बेड्या ठोकल्या.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, " नोकरीचे आमिष असो की, चित्रपटात काम करण्याचे पालकांनी बळी पडू नये. कोणीही पैसे घेऊन नोकरी किंवा चित्रपटात काम देतो, असे सांगितल्यास संबंधिताची तक्रार पोलिसांना द्या." (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT