संगमनेर - घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी शहरात उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता भासू लागल्याने आमदार बाळासाहेब थोरात यांनी १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची मागणी केली होती. येत्या महिनाभरात या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
विविध प्रकारच्या लहान-मोठ्या रुग्णालयांमुळे संगमनेर शहर हॉस्पिटल हब बनले आहे. मात्र या तारांकित सुविधांचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना घेता येत नसल्याने, त्यांच्यासाठी शासकीय रुग्णालये वरदान ठरतात. त्यादृष्टीने संगमनेर शहराजवळच्या घुलेवाडी येथे ३० खाटांचे ग्रामीण आरोग्य केंद्र कार्यरत आहे. मध्यंतरी कोविड महामारीच्या काळात वैद्यकीय सेवेची व्याप्ती वाढवण्याची निकड भासल्याने,
या आरोग्य केंद्राच्या जागेत १०० खाटांच्या अद्ययावत उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावाला शासनाकडून हिरवा कंदीलही मिळाला. मात्र राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे हे काम लाल फितीत अडकले. राज्यभरात रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढल्याने सर्वत्र उपजिल्हा रुग्णालयांच्या मागणीने जोर धरला होता. राज्य सरकारने त्यानंतर तातडीने या कामांना मंजुरी दिली होती. त्यात संगमनेर येथे उपजिल्हा उपरुग्णालयास मंजुरी मिळाली आहे.
ग्रामीण रुग्णालयात सुमारे दोन महिने पुरेल इतका औषध साठा उपलब्ध आहे. सात वैद्यकीय पथकांकडून शाळांची तपासणी करण्यात येत असून, गरजेनुसार एसएमबीटी, पुणे व मुंबईतील करार केलेल्या रुग्णालयांमार्फत संदर्भ सेवा व शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. आयुष्यमान, आभा कार्ड आदी सेवा पुरविण्यात येतात. मात्र सुरक्षारक्षक व स्वछता कर्मचाऱ्यांची निकड भासते आहे.
डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधीक्षक
कॉटेज रुग्णालयाचे रूपांतर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात झाले असून, २०१७ पासून वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, औषधनिर्माते, परिचारिका व ३० आशा सेविका, असा मोठा कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. तसेच शहरामधील जनतानगर, घासगल्ली व पानसरे आखाडा येथे दुपारी २ ते रात्री १० या वेळेत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. त्याचा लाभ सर्वांना होत आहे.
डॉ. सुरेश घोलप, तालुका आरोग्याधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.