ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : गुटख्याचा ‘आरामदायी’ प्रवास; पोलिसांच्‍या गळाला बडे मासे लागेनात; चोरट्या मार्गाने लाखोंच्या गुटख्याची तस्करी

शहरातील जवळपास सर्वच शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पानटपऱ्यांचा व्यवसाय तेजीत सुरू असतो.

सकाळ वृत्तसेवा

श्रीकांत राऊत

अहमदनगर - नगरमध्ये दर महिन्याला लाखोंचा गुटखा चोरट्या मार्गाने दाखल होतो. कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांमधून गुटखा व सुगंधी तंबाखूची तस्करी महाराष्ट्रात होते. नगरमध्ये दाखल होणारा बहुतांश गुटख्याचा साठा ट्रॅव्हल्सव्दारे वाहतूक करून आणला जातो. त्यानंतर मोठ्या डिलरकडून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवला जातो. पोलिस गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांना पकडतात, पण बडे मासे मात्र सहजासहजी गळाला लागत नाहीत किंवा पोलिस कारवाई करत नाहीत. परराज्यातून गुटख्याची तस्करी रोखण्यात पोलिसांची नाकाबंदी फेल ठरतेय असे यामधून दिसत आहे.

शहरातील जवळपास सर्वच शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पानटपऱ्यांचा व्यवसाय तेजीत सुरू असतो. गुटख्याचे बडे डिलर साखळी पद्धतीने हा माल विक्रेत्यांपर्यंत पोहोचवतात. गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट राज्यात ॲक्टीव्ह आहे. गुटख्याचा साठा नगरमध्ये दाखल करण्यासाठी मोठी साखळी काम करते. बहुतांश गुटखा व सुगंधी तंबाखू साठा हा कर्नाटक राज्यातून नगरमध्ये आयात होतो. त्यानंतर मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात हा साठा नगरमध्ये आणला जातो.

मध्य प्रदेशातील इंदोरमधून सुटणाऱ्या खासगी बसेसमधून गुटखा नगरमधील जुने बसस्थानक व कोठला स्टॅंड परिसरात उतरविला जातो. लाखोंचा गुटखा गोण्यांमध्ये भर,न नगरमध्ये आणला जातो. पहाटेच्या वेळी गुटख्याच्या गोण्या शहरात खाली होत असताना पोलिसांच्या नजरेतून हा प्रकार कसा सुटतो, ही आश्र्चर्याची बाब आहे. तसेच कर्नाटकमधून सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत दाखल होणारा गुटखा फलटण, बारामती, दौंड या मार्गे नगरमध्ये आणला जातो. त्यामुळे पोलिस गुटख्याची तस्करी होतानाच या तस्करांच्या मुसक्या का आवळत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होतो.

शाळकरी, महाविद्यालयीन मुले ‘टार्गेट’ गुटखा, सुगंधी तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये अलीकडील काळात शाळकरी, महाविद्यालयीन मुलांचा समावेश झाला आहे. शाळांच्या, महाविद्यालयांच्या परिसरात टपऱ्यांची संख्या जास्त असण्यामागे गुटखा तस्करांचे मोठे व्यावसायिक गणित अवलंबून आहे. या मुलांना लहान वयात एकदा ‘हिरा’चा चस्का लागला, तर ही मुले त्यासाठी पैशांची तजवीज कशीही करतात; पण, ‘तलफ’ पूर्ण करतात. घरून पैसे मिळणे बंद झाले की, व्यसनाधीन झालेली हीच मुले गुन्हेगारीकडे वळतात.

यंत्रणेशी ‘अर्थ’पूर्ण संबंध परराज्यातून ट्रॅव्हल्स व मोठ्या वाहनाने जिल्ह्यात गुटखा आणला जातो. त्यानंतर जिल्ह्यात हा गुटखा वितरीत होतो. रात्रीच्या अंधारात कधी वाळूच्या डंपरमधून, कधी टेम्पो, कधी ट्रक अशा वाहनांमधून गुटख्याची तस्करी केली जाते. यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, कारवाई एखादे वेळीच होते. गुटखा तस्करांचे यंत्रणेशी असलेले ‘अर्थ’पूर्ण संबंध मोडीत काढून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.

पोलिस, अन्न व औषध प्रशासनाला गुटखा व सुगंधीत तंबाखूवर बंदी घालण्यासाठी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. ही कारवाई कडक राबविण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे. शहरातील अनधिकृत टपऱ्यांवरही कारवाई सुरू आहे. सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी, अहमदनगर प्रतिबंधित गुटखा वाहतूक होत असल्यास कारवाई करण्यात येईल. खासगी बसेसद्वारे गुटख्या वाहतूक होत असल्यास संबंधित पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना देण्यात येतील. राकेश ओला, पोलिस अधीक्षक, अहमदनगर अन्न व औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी आहे. शहरातील किराणा दुकाने, टपऱ्या या ठिकाणी तपासणी केली जाईल. पोलिस प्रशासनाच्या मदतीने गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भूषण मोरे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT