Ahmednagar news esakal
अहिल्यानगर

Ahmednagar : विमा रक्कम न दिल्यास गुन्हे दाखल करणार ; विश्वनाथ कोरडे

कंपनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव, कार्यालयावर काढणार मोर्चा

सकाळ डिजिटल टीम

टाकळी ढोकेश्वर : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत तालुका महसूल मंडळामध्ये जून ते १८ ऑगस्ट २०२३ दरम्यान राज्य सरकारमार्फत उतरविण्यात आलेला विमा सर्वेक्षण होऊन देखील शेतकऱ्यांना याची रक्कम मिळत नाही याबाबत कृषी विभागाकडून सर्व पूर्तता होऊनही सातत्याने कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याने ही रक्कम त्वरित द्या; अन्यथा कंपनीवर गुन्हे दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली.

येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कोरडे यांनी शेतकऱ्यांसमवेत विमा कंपनी अधिकारी सचिन फाजगे यांना घेराव घालून याबाबत विचारणा केली. जून ते ऑगस्ट दरम्यान पावसाचा खंड पडलेला आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट आली आहे. यामध्ये सोयाबीन, बाजरी, भूईमूग, मूग, तूर, उडीद, कांदा या पिकांची नुकसानीची टक्केवारी निश्चित करून कृषी विभागामार्फत अहवाल देखील पाठविण्यात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ही विमा रक्कम का अडविण्यात येत आहे, अशी विचारणा करण्यात आली.

कंपनी प्रतिनिधींनी दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याने सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास कायद्यानुसार कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे व कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सर्वोनुमते ठरविण्यात आले. यावेळी सुभाष दुधाडे, माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, शेतकरी शिवाजी थोरात, प्रकाश ठाणगे, दशरथ चौधरी, अर्जुन नवले, भरत ठुबे, संदीप ठुबे, शकील शेख आदी उपस्थित होते.

एकूण शेतकरी१४८८११

विमा संरक्षित क्षेत्र७१२५१

एकूण रक्कम४० कोटी ८४ लाख

केंद्र सरकार१६ कोटी ८३ लाख

राज्य सरकार२३ कोटी ९८ लाख

विमा संरक्षित रक्कम२९७ कोटी ३२ लाख

जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेनुसार तालुक्यातील टाकळी ढोकेश्र्वर, वाडेगव्हाण, सुपे, पारनेर, भाळवणी, वडझिरे, पळशी या महसूल मंडळामध्ये सर्वेक्षण करून देण्यात आले. त्यानुसार कंपनीस अधिसूचित पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगावू रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी संभाव्य रक्कम देण्यासाठी आदेश करण्यात आले आहेत.

- गजानन घुले, तालुका कृषी अधिकारी

विमा कंपनीमार्फत सातत्याने शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत आहे. विमा रक्कम पोटी केंद्र व राज्य सरकारने ४० कोटी रुपये खर्च केले आहेत. कृषी विभागामार्फत नुकसानीचा सर्व्हे देखील पूर्ण झाला आहे. मात्र, विमा कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सर्व स्तरावर पाठपुरावा करणार आहे.

- विश्वनाथ कोरडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप

सर्वेक्षणाच्या अहवालानुसार सर्व प्रस्ताव विमा कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. सोमवारी याबाबत अहमदनगर कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सकारात्मक निर्णय होईल.

- सचिन फाजगे, विमा कंपनी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT