अहमदनगर : कितीही चांगले काम केले आणि एखादी गोष्ट चुकली, तर तिचा गवगवा करून चांगले काम करणाऱ्याला नामोहरम करण्याच्या घटना सध्या घडत आहेत. त्याचा शासकीय कार्यालयांतील अनेकांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आता सर्वांनीच खबरदारी बाळगत सिमऐवजी व्हॉट्सॲपवरून कॉल करण्याचा पर्याय निवडला आहे. व्हॉट्सॲप कॉलचे स्तोम आता शासकीय कार्यालयांमध्ये वाढू लागले आहे.
जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा कामकाजानिमित्ताने रोज अनेकांशी संपर्क येत आहे. यामध्ये कामे पटकन व्हावे म्हणून एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन त्यावर संपर्क साधले जात आहेत. त्यातून कामे घरबसल्या होऊ लागली आहेत. या मोबाईलचे फायदे तितकेच तोटे आता दिसू लागले आहेत. अनेक प्रकरणे आता उघडकीस येत आहेत. जिल्ह्यात कॉलवर झालेले बोलणे व्हायरल होण्याच्या घटना आता नित्यानेच घडू लागलेल्या आहेत. जो चुकीचा कारभार आहे, त्याचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे. मात्र या कॉल रेकॉर्डचा आता गैरवापर होऊन, अनेकांना मनस्ताप होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.