Ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : अहिल्यानगर @ ता. जि. अहमदनगर! शहरातील आस्थापनांना मनपाचे पत्र; आठ दिवसांत अहमदनगर नाव काढणार

Ahmednagar : अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यात आले असून, येत्या आठ दिवसांत शहरातील सर्व आस्थापनांना आपले नाव बदलण्याचे महापालिकेचे आदेश दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांच्या इमारतीवरील नाव बदलून अहिल्यानगर महानगरपालिका असे करण्यात आले आहे, तसेच शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बँका, शाळा-महाविद्यालये अशा सर्व आस्थापनांनीही ‘अहिल्यानगर, ता. जि. अहमदनगर’ असे नाव लावावे, तसे पत्र महानगरपालिकेने त्यांना दिले आहे.

येत्या आठ दिवसांत सर्व ठिकाणचे अहमदनगर नाव हटवून अहिल्यानगर असे करण्यात येईल, अशी माहिती आज आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे.केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर राज्य सरकारने अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर असे करण्याबाबतचे आदेश काढले आहेत.

महानगरपालिकेने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. जुने महापालिका कार्यालय, आरोग्य केंद्र, प्रभाग समिती कार्यालये आदी ठिकाणचे जुने नाव हटवून अहिल्यानगर महानगरपालिका असे करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात अनेक आस्थापना असून, त्यांच्याशी महापालिकेने पत्रव्यवहार केला आहे.

एसटी महामंडळाची बसस्थानके, रेल्वे स्टेशन, सहकारी बँका, शाळा-महाविद्यालये आदींनी आपला कार्यालयीन पत्ता, तसेच इमारतींवरील नावे बदलून अहिल्यानगर असे करावेत, असे पत्र महानगरपालिका प्रशासनाने दिले आहे.

शहरात चौक, दिशादर्शक फलक, स्वागत कमानी, उद्याने, रस्त्यांची नावे असे ज्या ठिकाणी अहमदनगर नाव असेल, तेथे अहिल्यानगर असे करण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांत ही नावे बदलण्याची कार्यवाही पूर्ण होणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कार्यालयांची नावे बदला

शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या फलकांवर असलेले अहमदनगर नाव बदलून अहिल्यानगर असे करावे, अशी मागणी शहर भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

पत्ता ‘अहिल्यानगर’

शासन आदेशानुसार अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर असे करण्यात आले आहे. परंतु नगर तालुका आणि जिल्ह्याच्या नामकरणाबाबत अनेकांच्या मनात संदिग्धता आहे. राज्य सरकारच्या शहरातील सर्व आस्थापनांच्या इमारतीवरील नाव आणि पत्ता अहिल्यानगर असे होणार आहे, तर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील कार्यालयांचा पत्ताही अहिल्यानगर असा होणार आहे. दरम्यान, नगर तालुका आणि जिल्ह्याच्या नामकरणाबाबत महसूल विभागाकडून पुढील कार्यवाही होणार आहे. सध्या अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर झाले असून, पत्ता सांगताना आणि लिहिताना सध्यातरी ‘अहिल्यानगर, ता. जि. अहमदनगर’ असेच राहणार आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार अहिल्यानगर नाव लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शहरातील आस्थापनांनी देखील नाव बदलून घ्यावे, तसे पत्र महापालिकेने दिले आहे. येत्या आठ दिवसांत सर्व ठिकाणी जुने नाव हटवून अहिल्यानगर असे नाव टाकण्याची कार्यवाही पूर्ण होईल.

- यशवंत डांगे, आयुक्त, महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

SCROLL FOR NEXT