murder Sakal
अहिल्यानगर

Crime: अकरा वर्षापूर्वी खून करुन प्रेत जाळले होते; आरोपीला बेड्या

सुमारे अकरा वर्षांपूर्वी एका ट्रक ड्रायव्हरचा खून करून त्याचे प्रेत सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) येथे जाळून पुरावा नष्ट केला.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : सुमारे अकरा वर्षांपूर्वी एका ट्रक ड्रायव्हरचा खून करून त्याचे प्रेत सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) येथे जाळून पुरावा नष्ट केला. पुणे जिल्ह्यात स्वतःचे नाव बदलून आणि ओळख लपवून वास्तव्य करत असलेला आरोपी अभिमान उर्फ भरत मारुती सानप (खडकवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) याला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Ahmednagar Crime News)

आरोपी भरत सानप आणि ट्रक ड्रायव्हर अनिल सखाराम सोनवणे (वय 29, रा. यमुनानगर, पुणे) हे दोघे ता. 23 मार्च 2011 मध्ये ट्रक (एमएच 12 एव्ही 6449) मधून रायपूर येथून बाईंडिंग वायर घेऊन पुण्याला येत होते. त्यांच्या ताब्यातील ट्रक भगवानबाबा गडा(ता. पाथर्डी) जवळ बेवारस अवस्थेमध्ये आढळला. ट्रकमधून मुद्देमाल गायब होता. ट्रकच्या केबिनमध्ये रक्ताचे डाग होते. त्यामुळे ड्रायव्हर अनिलच्या भाऊ नितीन यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात अपहरण व जबरी चोरी झाल्याची फिर्याद दिली. ही घटना झाल्यापासून अनिल सोबत असलेला सहकारी ड्रायव्हर भरत सानप हा फरार होता.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाच्या उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपासाची सूचना स्थानिक गुन्हे शाखेला केलेल्या होत्या. त्यानुसार विशेष पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.

आरोपी भरत सानप याची शोध मोहिम राबविली. तो पुणे येथे राहून ड्रायव्हर म्हणून काम करत होता. कन्हेरवाडी (ता. परळी, जि. बीड) येथे स्वतःचे नाव बदलून राहत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने स्वतःचे नाव अभिमान मारुती सानप (वय 37) असे सांगितले. त्याची कागदपत्रे तपासली असता मतदान ओळखपत्रावर आणि आधार कार्डवर विसंगती आढळली. त्याचा सातबारा उतारा तपासला असता, भारत उर्फ अभिमान असा उल्लेख आढळून आला. त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने 2011 मध्ये अनिल सोनवणेचा खून केल्याची कबुली दिली.

अनिल आणि भरत यांच्यामध्ये काही कारणांमुळे वाद निर्माण झाले होते. देवरी गाव (जि. गोंदिया) येथे ट्रकच्या टायरमधील हवा तपासण्याच्या निमित्ताने थांबलेले असताना भरतने अनिलच्या डोक्‍यात लोखंडी पान्हा मारला, अनिल जागीच बेशुद्ध होऊन मरण पावला. अनिलचे प्रेत उचलून गाडीचा केबिनमध्ये टाकले हा ट्रक चालवत तो सिंदखेड राजा येथे एका नाल्याच्या पुलाजवळ ट्रक थांबवून प्रेत जाळून पुरावा नष्ट केला. सिंदखेड राजा पोलिसांना अनोळखी व्यक्‍तीचे प्रेत सापडल्याने त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा कोणताही तपास लागला नव्हता.

या पथकाचे परिश्रम

पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाणे, भीमराज खरसे, सुरेश माळी, रवीकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार, बबन बेरड यांच्या पथकाने परिश्रम घेतले.

साडे पाच लाखांच्या मालाची विल्हेवाट

भरत याने त्याच्या ओळखीच्या सुनील आश्रुबा सानप आणि परमेश्‍वर उत्तम दराडे यांच्या मदतीने ट्रकमधील पाच लाख 48 हजार 940 रुपये किमतीची बाइंडिंगची वायरची विल्हेवाट लावली. ट्रक भगवान बाबा गडाजवळ सोडून पसार झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

IND vs AUS : लपक-झपक... Dhruv Jurel चा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियन फलंदाजही स्तब्ध, Video viral

IPL 2025 Auction Live: एकाच डावात १० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासाठी चेन्नई-मुंबईमध्ये चढाओढ! कोण आहे Anshul Kamboj?

Beed News: पत्नीला अर्धांगवायू झाल्याचे समजताच पतीचा हृदयविकाराने मृत्यू; अंबडमध्ये धक्कादायक घटना

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

SCROLL FOR NEXT