Balasaheb Thorat esakal
अहिल्यानगर

Balasaheb Thorat : थोरातांनी माफी मागावी; सकल हिंदू समाजाची मागणी

सकाळ डिजिटल टीम

श्रीरामपूर : संगमनेरला सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ जूनला मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांबद्दल माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज (ता.१६) सकल हिंदू समाजाच्या वतीने येथील प्रशासकीय कार्यालयासमोर घोषणाबाजी केली.

आमदार थोरात यांनी केलेल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रभारी तहसीलदार राजेंद्र वाकचौरे व पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी उपस्थित होते.

भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे म्हाणाले, की संगमनेरला सकल हिंदू समाजाच्या वतीने ६ जूनला संगमनेर शहरामध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांबद्दल माजी मंत्री आमदार थोरात यांनी अवमानकारक वक्तव्य करुन एकप्रकारे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या. दंगलखोरांची उपमा देत अपमान केला आहे. मोर्चा शांततामय मार्गाने झाल्यानंतर समनापूर येथील घटना पूर्वनियोजित होती, असा मोर्चाच्या आयोजकांवर जाणीवपूर्वक आरोप केला आहे.

संगमनेरमध्ये निघालेला मोर्चा हा तालुक्यातील मागील अनेक दिवसांपासून घडलेल्या घटनांकडे पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी होता. ग्रामीण भागातील युवकांना एका समाजाच्या समुदायाकडून झालेली मारहाण ही गंभीर घटना असताना सुध्दा याबाबत आमदार थोरात यांनी सहानुभूती न दाखविता गप्प बसण्याची भूमिका घेतली. जिल्ह्यामध्ये नगर, शेवगाव आणि अन्य ठिकाणी झालेल्या घटनांबाबतही त्यांनी कुठेही भाष्य केले नाही.

आमदार थोरात यांनी केलेल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी करून सकल हिंदू समाजाच्या मोर्चाबाबत त्यांची वक्तव्य थांबली नाहीत तर, यापुढे संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलने करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी नानासाहेव पवार, शरद नवले, गिरीधर आसने, नितीन दिनकर, मारूती बिंगले, अभिषेक खंडागळे, गणेश राठी, अनिल भनगडे, संदिप शेलार, सतिश सौदागर, मंजुषा ढोकचौळे, छाया बर्डे, पूजा चव्हाण, अनिता शर्मा, सुप्रिया धुमाळ, पुष्पा हरदास, मिलिंदकुमार साळवे, रूपेश हरकल, दत्ता जाधव आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT