snack Esakal
अहिल्यानगर

Ahmednagar : फणा काढणाऱ्या नागाची मोराने अडवली वाट; श्वास रोखून ‘प्रीतिसुधाजी’च्या विद्यार्थ्यांनी पाहिला थरार

दोन दिवसांपूर्वी दुपारी दोनच्या सुमारास क्रीडांगणाच्या भिंतीलगतच्या सावलीतून नाग वेगाने निघाला.

सतीश वैजापूरकर

राहाता - हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणाच्या भिंतीजवळून सळसळत निघालेल्या नागराजाची वाट एका मोराने अडविली. फणा उभारून फुत्कार टाकीत दंश करण्याच्या त्याच्या प्रयत्नाला भीक न घालता मोराने आपली अणकुचीदार चोचेची करामत दाखवत त्याला जागचे हलणे मुश्कील केले.

मोर व नागात अर्धातास सुरू असलेला सामना विद्यार्थी श्वास रोखून पहात होते. शेवटी सर्पमित्र विजय मोरे यांनी नागाला पकडले आणि माळरानावर सोडले. या आगळ्यावेगळ्या सामन्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

दोन दिवसांपूर्वी दुपारी दोनच्या सुमारास क्रीडांगणाच्या भिंतीलगतच्या सावलीतून नाग वेगाने निघाला. मोराची दृष्टी त्याच्यावर जाताच तो पळतच त्याच्या वाटेवर जाऊन उभा राहिला. नागाने पुढे जाण्याचा प्रयत्न केली की मोर त्याला आपली मान त्याच्या दिशेने नेत अणकुचीदार चोचीची भीती दाखवू लागला. त्यावर नागाने फणा उभारून मोरावर फुत्कार टाकायला सुरुवात केली.

फुत्कार टाकीत नाग झेपावला की मोर एक पाऊल मागे येई आणि आपल्या चोचीची भीती त्याला दाखवी. चोचीच्या भीतीने नाग भिंतीच्या दिशेने मागे सरके. काहीवेळात मोराने त्याच्यावर एवढे नियंत्रण मिळविले की नाग फणा उभारून स्तब्ध उभा राहिला. त्याने हालचाल केली की लगेच मोर त्याच्या दिशेने आपली चोच नेई. सुमारे अर्धा तास हा नाग स्तब्ध राहिला आणि मोर त्याला जागचे हलू देईना. विद्यार्थी श्वास रोखून अर्धातास चाललेले हा सामना पहात होते.

या शैक्षणिक संकुलात हिरवीगर उंच झाडी आहे. त्यावर वर्षभर मोर वास्तव्यास असतात. हे मोर नाग आणि सापांपासून विद्यार्थ्यांचे रक्षण करतात. दोन दिवसांपूर्वी त्याचा प्रत्यय आला. मोरापुढे नाग अक्षरशः हतबल झाला. या अनोख्या सामन्याची चित्रफित सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे.

प्राचार्य इंद्रभान डांगे, संस्थापक, साध्वी प्रीतिसुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल, राहाता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

Accident: खोपोलीजवळ बस अन् टेम्पोचा मोठा अपघात, ९ जण जखमी

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

SCROLL FOR NEXT