ahmednagar  esakal
अहिल्यानगर

Rohit Pawar: आता भाजपमध्ये जायला हवं का? बारामती अ‍ॅग्रोच्या कारखान्यावर EDच्या कारवाईनंतर रोहित पवारांचा खोचक सवाल

‘ईडी’ने केलेल्या कारवाईवर आमदार रोहित पवार यांनी मिश्‍कील टिप्पणी केली आहे. ‘आता भाजपमध्ये जायला पाहिजे का’, असा प्रश्‍न त्यांनी विचारला.

सकाळ डिजिटल टीम

Rohit Pawar Factory Seized by ED: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’ कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज जप्त केली. कारखान्याची १६१ एकर जमीन ‘ईडी’ने जप्त केल्याची माहिती आहे. या मालमत्तेची किंमत जवळपास ५० कोटी रुपये असल्याचे समजते. या कारवाईबाबत ‘ईडी’ने समाजमाध्यमांवरून माहिती दिली असून कारखाना प्रशासनाने याबाबत आम्हाला काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे.

शिखर बँक गैरव्यवहारप्रकरणी रोहित पवार यांची यापूर्वी ‘ईडी’कडून दोन ते तीनवेळा चौकशी झालेली आहे. याशिवाय ‘ईडी’ने बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडसह छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड एसएसके या बंद साखर कारखान्याच्या खरेदीच्या संबंधाने एक फेब्रुवारीला चौकशी केली होती.

रोहित पवार यांची तब्बल ११ तास चौकशी झाली होती. आता या कारखान्याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. रोहित पवार यांची चौकशी होत असलेले प्रकरण हे महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आहे. या प्रकरणी पाच जानेवारीला ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीसह सहा ठिकाणी छापे घातले होते. (Latest Marathi News)

कन्नड सहकारी साखर कारखाना तोट्यात गेल्यानंतर त्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला होता. या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांतून पैसे कर्ज म्हणून घेतले होते. लिलावाच्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता व त्यावेळी केवळ ५० कोटी रुपयांना बारामती अॅग्रोने या कारखान्याची खरेदी केल्याचा आरोप आहे.

‘भाजपमध्ये जायला हवे का?’

‘ईडी’ने केलेल्या कारवाईवर आमदार रोहित पवार यांनी मिश्‍कील टिप्पणी केली आहे. ‘आता भाजपमध्ये जायला पाहिजे का’, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले,‘‘भाजपने लक्षात ठेवावे, झुकणारे आणि रडणारे गेले. आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्ने बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरून आचारसंहिता दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतेय.’’ कंपनीवर केलेली कारवाई पूर्णतः बेकायदा आहे. (Latest Marathi News)

याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. ‘‘वाढदिवसाच्या दिवशीही अशीची कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे 'ते' दोन नेते फडणवीसांच्या जवळचे, मात्र लढावे लागणार 'धनुष्यबाणा'वर; कारण काय?

Emerging Asia Cup: भारताला हरवणाऱ्या अफगाणिस्तानने मिळवले जेतेपद ! फायनलमध्ये श्रीलंकेवर केली मात

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

SCROLL FOR NEXT